नवी दिल्ली : लोकसभेत विरोधी पक्षांनी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणलेला आहे. अविश्वास ठरावावर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांचे खासदार त्यांची बाजू मांडत असताना आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं देशातील सात लोकसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील पुणे आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आलेली नाही यामुळं आश्चर्याचा धक्का बसलेला आहे.

कोणत्या मतदारसंघात निवडणूक जाहीर?

झारखंडमधील डुमरी, केरळमधील पुथुपल्ली, त्रिपुरातील बोक्सानगर, धनपूर, पश्चिम बंगालमधील धुपगडी, उत्तर प्रदेशातील घोसी आणि उत्तराखंडमधील बागेश्वर या सात लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. झारखंडमधील डुमरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार जगन्नाथ महतो यांच्या निधनानं जागा रिक्त झालेली आहे., केरळमधील पुथुपल्ली मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार ओमेन चंडी यांचं १८ जुलै महिन्यात निधन झालं होतं. , त्रिपुरातील बोक्सानगर चे खासदार समसूल हके यांचं देखील निधन झालं. तर, धनपूरच्या खासदार प्रतिमा भौमिक यांनी खासदार पदाचा राजीनामा दिला., पश्चिम बंगालमधील धुपगडीचे खासदार बिष्णू पदा रे यांच्या निधनानं जागा रिक्त झाली होती. उत्तर प्रदेशातील घोसीमधील दारा सिंह चौहान यांनी राजीनामा दिल्यानं जागा रिक्त झाली आणि उत्तराखंडमधील बागेश्वर मतदारसंघात चंदन रामदास यांच्या निधनानं जागा रिक्त झाली होती. या सात लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

पुणे चंद्रपूरची लोकसभा पोटनिवडणूक न लागल्यानं आश्चर्याचा धक्का

पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार यांचं २९ मार्च २०२३ ला निधन झालं होतं. त्यामुळं त्यांच्या निधनानं ती जागा रिक्त झालेली आहे. तर, दुसरीकडे चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार यांचं ३० मे रोजी दिल्लीतील रुग्णालयात उपचार घेताना निधन झालं होतं. त्यामुळं त्यांची जागा देखील रिक्त झालेली आहे. देशातील इतर सात लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झालेली असताना महाराष्ट्रातील पुणे आणि चंद्रपूरमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर न झाल्यानं आश्चर्याचा धक्का बसला आहे.

लोकसभा पोटनिवडणुकीचं वेळापत्रक

१० ऑगस्ट : अधिसूचना जारी होणार १७ ऑगस्ट : अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक१८ ऑगस्ट : अर्जांची छाननी २१ ऑगस्ट : अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत५ सप्टेंबर : मतदानाचा दिवस ८ सप्टेंबर : मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार १० सप्टेंबर : निवडणूक प्रक्रिया पूर्ण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here