नवी दिल्ली: महिला फुटबॉल वर्ल्डकप २०२३ मध्ये स्वित्झर्लंडचा अंतिम १६च्या फेरीत स्पेनकडून पराभव झाला. स्वित्झर्लंडचा पराभव झाला असला तरी या संघातील फॉरवर्ड अलीशा लेहमेन्न हिची जोरदार चर्चा सुरू आहे. अलीशा लेहमेन्नला चाहते तिच्या फुटबॉल मैदानावरील खेळासाठी नाही तर सौदर्यांसाठी ओळखतात.
स्वित्झर्लंडची स्टार महिला फुटबॉलपटू अलीशा लेहमन्न ही तिच्या खेळासोबत सौंदर्यमुळे नेहमी चर्चेत असते. अलीशा स्वित्झर्लंडच्या महिला संघातील स्टार खेळाडू आहे. या शिवाय तिचे सोशल मीडियावर देखील फॉलोअर्स मोठा आहे.
स्वित्झर्लंडची स्टार महिला फुटबॉलपटू अलीशा लेहमन्न ही तिच्या खेळासोबत सौंदर्यमुळे नेहमी चर्चेत असते. अलीशा स्वित्झर्लंडच्या महिला संघातील स्टार खेळाडू आहे. या शिवाय तिचे सोशल मीडियावर देखील फॉलोअर्स मोठा आहे.
अलीशा तिच्या वैयक्तीक आयुष्यातील घटनेमुळे चर्चेत असतात. अलीशा तिच्या संघातील एका महिला खेळाडूसोबत रिलेशनशीपमध्ये होती. यामुळेच तिला लेस्म्बियन म्हटले जात होती पण नंतर बी बाय-सेक्शुअल असल्याचे समोर आले.
अलीशा राष्ट्रीय संघातील महिला खेळाडू रोमानाला डेट करत होती. दोघींनी सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले होते, जे व्हायरल देखील झाले होते. पण काही दिवसांनी दोघींचे ब्रेकअप झाले. त्यानंतर अलीशा एस्टन व्हिला मेंस संघातील मिडफिल्डर डगलस लुईसला डेट करत आहे.
अलीशाने २०१७ साली वयाच्या १८व्या वर्षी राष्ट्रीय संघात पदार्पण केले होते. २०१८ साली फिनलँडविरुद्ध तिने पहिला आंतरराष्ट्रीय गोल केला होता.
अलीशाचे इंस्टाग्रामवर १४ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. फुटबॉलसह ती अन्य फोटो देखील शेअर करत असते.