धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे हे लवकरात राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे. अनिल गोटे यांनी आपल्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सुपूर्द केला आहे. अनिल गोटे लवकरच अजित पवार गट किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटात जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अनिल गोटे येणाऱ्या काही दिवसांमध्ये काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

२०१४ च्या निवडणुकीत अनिल गोटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपच्या तिकिटावर धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले होते. मात्र, त्यानंतर भाजपमधील अंतर्गत कलहानंतर अनिल गोटे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीची वाट धरली होती. २०१९ पासून राष्ट्रवादीत आल्यानंतर अनिल गोटे यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र जिल्ह्यात राष्ट्रवादीत दोन गट असल्याचे देखील वेळोवेळी समोर आले होते. अखेर गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार आपला स्वतंत्र गट घेऊन सत्तेत सहभागी झाल्यानंतर आता राज्यातील अनेक पदाधिकारी अजित पवार यांच्यासोबत जात आहे.
शेतकऱ्यांच्या कामाची बातमी, जमिनीच्या मोजणीसाठी आता वाट पाहावी लागणार नाही, कारण…
धुळे जिल्ह्यातून अनिल गोटे यांच्याकडून देखील शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. गेल्या गुरुवारी अनिल गोटे यांनी प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्ष श्रेष्ठींकडे सुपूर्द केला होता. लवकरच अनिल गोटे हे अजित पवार गट किंवा उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत अनिल गोटे उद्या आपली भूमिका जाहीर करणार असून ते नेमकी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मुंबई कोल्हापूर मार्गावर वंदे भारत ट्रेन कधी सुरु होणार? रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलं उत्तर, म्हणाले…
अनिल गोटे भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वाद झाल्यानंतर बाहेर पडले होते. अनिल गोटे यांनी भाजपमध्ये जाण्यापूर्वी शेतकरी संघटनेमध्ये देखील काम केलं होतं. अनिल गोटे आता उद्या कोणती राजकीय भूमिका जाहीर करणार याकडे धुळे जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

जयप्रभा स्टुडिओ प्रकरण; राजेश क्षीरसागर कुटुंबियांनी कोल्हापूरकरांना चुना लावला, ठाकरे गटाचा आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here