वाचा:
नगरच्या राष्ट्रवादी भवन येथे शनिवारी सायंकाळी राज्यमंत्री तनपुरे आले होते. यावेळी त्यांना सुशांतसिंह राजपूत प्रकरणावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘या प्रकरणाचा मी फारसा आढावा घेत नाही. तसेच रोजच्या रोज अपडेट घेत नाही. पण कायद्याने जी चौकशी चालू आहे, या चौकशीमधून जे बाहेर येईल ते कळेलच,’ असे सांगतानाच तनपुरे यांनी अधिक बोलणे टाळले.
राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याबाबत भाजपने राज्यात ठिकठिकाणी घंटानाद आंदोलन केले आहे. यावर तनपुरे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयाने जो अंतिम परीक्षेबाबत निर्णय दिला आहे, त्यानुसार आमचे काम चालू आहे. त्यामुळे भाजपचे आंदोलन कसे झाले? याचा मी आढावा घेतला नाही. परंतु याबाबत सरकार जी भूमिका घेत आहे, ती सर्वसमावेशक व लोकांची सुरक्षा बघून घेत असते. याबाबत मुख्यमंत्री योग्य भूमिका घेतील. त्यामुळे धार्मिक स्थळे उघडण्याबाबत मी माझे व्यक्तिगत मत देऊ शकत नाही.’
वाचा:
दरम्यान, सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठं वादळ पाहायला मिळत आहे. आधीच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. त्यात पवार कुटुंबातही मोठा कलह झाला. याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणारे यांना यांनी फटकारले. पार्थच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही, असे बोलून पवार यांनी सगळ्यांनाच धक्का दिला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने एक निर्णय देत हे प्रकरण मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे वर्ग करण्यास सांगितले असले व सीबीआयचा तपासही सुरू झाला असला तरी राजकीय वर्तुळात मात्र वातावरण तापलेलंच आहे. याप्रकरणाला रोज नवी वळणे मिळताना दिसत असून राजकीय कनेक्शनबाबतच्या आरोपांमुळे भाजप विरुद्ध महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष असा संघर्ष पेटला आहे. त्यामुळेच या प्रकरणावर बोलताना सगळेच सावध पवित्रा घेताना दिसत आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times