कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशनवरील वेटिंग रूममधून सकाळच्या सुमारास चार वर्षांच्या मुलाचं एका व्यक्तीने अपहरण केलं होतं. याप्रकरणी कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने तपास करत अवघ्या आठ तासांत या मुलाचा शोध त्याला आई-वडिलांच्या ताब्यात दिलं. सोमवारी दुपारी ही अपहरणाची घटना घडली होती. मुलाचं अपहरणारा कचरू वाघमारे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. धक्कादायक म्हणजे कचरू वाघमारेला चार मुली आहेत. आणि मुलाच्या हव्यासापोटी त्याने या चिमुकल्याचं अपहरण केल्याचं तपासात समोर आलं आहे.
ठाणे-पनवेल लोकलमध्ये किळसवाणा प्रकार, महिला डब्यात ती प्लास्टिक पिशवी पाहून प्रवाशांचा संताप
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात राहणारे करण गुप्ता आणि त्याची पत्नी शुभांगी गुप्ता हे दोघे मजुरीचं कामं करतात. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात छोट्या-मोठ्या वस्तूंची विक्री करून उदरनिर्वाह करतात. त्यांना दोन वर्षांची मुलगी कीर्ती आणि चार वर्षांचा अथर्व ही दोन मुलं आहेत. वेटिंग रूममध्ये कपडे धुण्यासाठी आले होते. यावेळी या दाम्पत्याकडे साबण नव्हता. मग आपल्या दोन्ही मुलांना कल्याण रेल्वे स्टेशनवरील वेटिंग रूममध्ये खेळायला सोडून ते साबण घेण्यासाठी स्टेशन बाहेर आले.
Crime News : चहा पिण्यासाठी पैसे देण्यास नकार, गुंडाने भर रस्त्यात साथीदारासोबत केलं भयंकर…
गुप्ता यांच्या मुलांसोबत आणखी चार मुली त्या ठिकाणी खेळत होत्या. त्या ठिकाणी एक जोडपे होते. त्यांना आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्यास सांगून करण गुप्ता हे आपल्या पत्नीसह साबण आणण्यासाठी गेले. साबण घेऊन परतल्यानंतर त्यांना धक्काच बसला. अथर्व आणि त्यांच्यासोबत खेळत असलेल्या चारही मुली तिथे नव्हत्या. करणने आजूबाजूला आपल्या मुलाचा शोध घेतला. मात्र मुलगा कुठेच आढळून आला नाही. अखेर त्याने कल्याण रेल्वे गुन्हे पोलीस ठाणे गाठले.

हॉल मिळायला उशीर, मराठी नाटक लांबलं; आमदार गीता जैन यांनी कर्मचाऱ्याला धारेवर धरलं

कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने तात्काळ या मुलाचा शोध सुरू केला. स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासले. मुलाच्या शोधासाठी पथके नेमली. सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास एक इसम अथर्वला घेऊन कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर आढळून आला. हा इसम नाशिकला जाणारी ट्रेन पकडण्याच्या घाईत होता. रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने या इसमावर झडप घालत त्याला ताब्यात घेतलं आणि मुलाची सुटका केली.

चौकशी दरम्यान या इसमाचे नाव कचरू वाघमारे असल्याचे समोर आले. कचरू वाघमारे याला चार मुली होत्या. त्याला मुलगा हवा होता. मुलाच्या हव्यासापोटी त्याने चार वर्षांच्या मुलाचं अपहरण केल्याचं समोर आलं. पोलिसांनी कचरूला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here