बुलढाणा: जिल्ह्यातील खामगाववरून अकोल्याकडे जात असलेल्या ट्रकचालकाने अचानक ब्रेक मारल्याने मागुन येणारी भरधाव वेगातील दुचाकी ट्रकवर आदळली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन्ही युवक जागीच ठार झाले. तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथील ज्ञानबंधु राजहंस जाधव (२५) आणि राज उर्फ प्रेम सागर बोदडे (१६) हे दोघे काल रात्री १०.३० वाजेदरम्यान दुचाकी (क्र. एमएच २८ बीजी ३८८५) ने खामगाववरून घरी जात होते.
मंडणगड येथे मोठा अपघात; एसटी बस पलटल्याने चालक, वाहक आणि नऊ प्रवासी जखमी
दरम्यान स्वराज पेट्रोल पंपानजीक अकोलाकडे जाणाऱ्या ट्रक (क्र. आरजे २७ जीसी ५७८१) चालकाने अचानक ब्रेक लावले. यामुळे ट्रकच्या मागे असलेली दुचाकी या ट्रकवर जोरात आदळली या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन्ही युवक जागीच ठार झाले. ज्ञानबंधु जाधव आणि राज उर्फ प्रेम चोदडे हे दोघे जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. या अपघातात दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

शाळेसाठी लांबचा प्रवास, पण घरी जायला बस नाही; विद्यार्थी संतापले

या प्रकरणी मृतकचे वडील राजहंस जाधव यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी ट्रक चालक विनोद सेवाराम परमार (३१) रा. मध्यप्रदेश याच्या विरोधात कलम २७९,३०४(२) ४२७ भादंवीनुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. या घटनेने कारेगाव हिंगणा गावात हळहळ व्यक्त होत आहे. सध्या रस्ते गुळगुळीत झाल्याने वाहनांवरील वेग अनियंत्रित झालेला आहे. राष्ट्रीय महामार्गावर तर वेगाची मर्यादा पाळली जात नाही. इथे चारचाकी सोबत दुचाकी वाहन देखील अमर्यादित वेगाने धावत आहे. हा अपघात देखील एक अनियंत्रित आणि सुसाट वेगानेच घडला हे त्याचे उदाहरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here