नागपूर : उमरेड तालुक्यातील मकरधोकडा तलावात पोहायला गेलेले दोन तरुण बुडाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. यात एकाचा मृतदेह सोमवारी मिळून आला. तर दुसऱ्या मृतदेहाचा शोध रात्रीपर्यंत सुरू होता. मंगळवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू झाली आणि दुसऱ्या तरुणाचा मृतदेह मिळून आला. आयुष ईश्वर सातपुडके (वय २२, भिवी, भिवापूर), आणि निखिल मुकुंद भगत (वय २५, नाड, ता.भिवापूर) अशी मृत तरुणाची नावं आहेत.
नागपूर पोलीस आयुक्तांचा दणका, चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई, उपराजधानीत नेमकं काय घडलं?
सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास दोन तरुणांना पोहण्याचा मोह आवरता न आल्याने त्यांना जीव गमवावा लागला. मकरधोकडा तलावातील नगरपालिकेच्या पंप हाऊसजवळ ही हृदयद्रावक घटना घडली. मृत आयुष सातपुडके आणि त्याचा चुलत भाऊ तसेच मृतक निखिल भगत आणि अनिकेत कांबळे हे चौघे सोमवारी दुपारी मकरधोकडा तलाव परिसरात दुचाकीने फिरायला गेले होते.
बायको स्कुटीवरून येत होती, तिची मोपेड अडविली, पोराला जबरदस्तीने उचललं, बापाने स्वत:च्याच लेकराचं अपहरण केलं
दरम्यान, निखिल आणि आयुष दोघेही तलावाच्या काठावर कपडे काढून तलावात उतरले. मात्र त्या दोघांनाही पोहाता येत नव्हते. तसेच तलावात किती पाणी आहे हे न कळल्याने दोघेही खोल खड्ड्यात पडले. हा प्रकार काही अंतरावर असलेल्या अन्य दोन मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करून त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. यापूर्वी दोघांचाही बुडून मृत्यू झाला होता.

७० किमी समुद्र, उंच लाटा अन् काळोखी रात्र, महाराष्ट्राच्या सुपुत्राचा इंग्लिश खाडीत टू वे पोहण्याचा विक्रम

यानंतर उमरेड पोलिसांना माहिती देण्यात आली. काही वेळातच मकरधोकरा चौकीचे पोलिस कर्मचारी आणि उमरेड पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने आयुषचा मृतदेह सापडला. मात्र अंधारामुळे निखिलचा पत्ता लागला नाही. मंगळवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू झाली आणि त्याचाही मृतदेह मिळून आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here