नवी दिल्ली:
सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड () ने एक नवीन ब्रॉडबँड प्लान आणला आहे. ही प्लान योजना १,९९९ रुपयांचा आहे. बीएसएनएलचा हा प्लान JioFiber च्या २,४९९ रुपयांच्या डायमंड प्लानला टक्कर देणारा आहे. बीएसएनएलने सुरू केलेला हा प्लान कंपनीच्या भारत फायबर पोर्टफोलिओचा एक भाग आहे आणि या प्लानमध्ये कंपनी २०० एमबीपीएस स्पीड देणार आहे. कंपनीच्या या प्लानमध्ये यूजर्सना १,५०० जीबी डेटा मिळेल.

डेटासह अमर्यादित व्हॉईस कॉलिंग

१,९९९ रुपयांचा प्रमोशनल भारत फायबर प्लान ८ जानेवारी २०२० पासून केवळ ९० दिवसांसाठी वैध आहे. बीएसएनएलच्या या योजनेत स्टँडर्ड डेटा बेनिफिटसह अमर्यादित व्हॉईस कॉलिंगलाही फायदा होणार आहे. ही योजना कंपनीच्या भारत फायबर पोर्टफोलिओचा एक भाग आहे. बीएसएनएल त्यामध्ये १.५ टीबी किंवा १,५०० जीबीची एफयूपी मर्यादा देत आहे.

बीएसएनएलच्या १,९९९ रुपयांच्या योजनेत फायदा

बीएसएनएलचे १,२७७ रुपयांपेक्षा जास्त रुपयांचे प्लान भारत फाइबर ब्रॉडबँड प्लान्स डेली डेटा बेनिफिटसह येतात. पण १,९९९ रुपयांच्या भारत फायबर प्लानमध्ये १.५ टीबी किंवा १,५०० जीबी पर्यंत 200 एमबीपीएस चा स्पीड मिळतो. त्यानंतर गती 2mbps पर्यंत कमी होते. पण 2 एमबीपीएस वर डाउनलोड आणि अपलोड करण्याला मर्यादा नाही. हा प्लान ९० दिवसांचा आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here