तज्ज्ञ काय म्हणतात
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तुमची आयटीआर प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला तुमचा परतावा मिळेल. रिफंड लगेच मिळत नाही. प्राप्तिकर विभागाकडे उपलब्ध माहितीनुसार आधीच भरलेल्या कराच्या तपशीलाची पडताळणी केल्यानंतर तुम्हाला परतावा दिला जाईल.
इतक्या आयटीआरवर प्रक्रिया
आयकर विभागाच्या वेबसाइटनुसार, ६१% आयटीआरची प्रक्रिया आधीच झाली असून यानंतर एसएमएसद्वारे त्या करदात्यांना सूचना आणि परताव्याची माहिती पाठविली गेली असेल. साधारणपणे, तुम्ही फाइल केल्यानंतर आणि तुमचा आयटीआर सत्यापित केल्यानंतर परतावा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी २० ते ४५ दिवस लागतात. मात्र, २०२२-२३ या आर्थिक वर्षात कर विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्राप्तिकर परताव्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे. त्यानंतर परतावा मिळण्याचा सरासरी वेळ केवळ १६ दिवसांवर आला आहे.
या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत
आयटीआर भरताना तुम्ही काही गोष्टींची अत्यंत काळजी घेतली पाहिजे. सर्वप्रथम, तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की आयटीआर भरताना तुम्ही जी काही माहिती भरत आहात ती पूर्णपणे अचूक असावी. यामुळे तुम्हाला परतावा मिळणे सोपे होईल. आपण आपल्या परताव्याची स्थिती कशी तपासू शकता हे देखील जाणून घेतले पाहिजे.
अशी तपासा परताव्याची स्थिती
सर्वप्रथम इन्कम टॅक्स इंडियाच्या वेबसाइटवर जा. तेथे तुमच्या युझर आयडीने लॉगिन करा. हा आयडी पॅन क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा कोड आहे. त्यानंतर रिटर्न फॉर्मवर जा. Choose One Option वर क्लिक करा आणि नंतर ड्रॉप डाउन मेनूमधून प्राप्तिकर रिटर्नवर क्लिक करा. मूल्यांकन वर्ष भरा आणि नंतर सबमिट करा. यानंतर, तुमच्या परताव्याची स्थिती जाणून घेण्यासाठी आयटीआरच्या पावती क्रमांकावर क्लिक करा.