लखनऊ: एका गर्भवती महिलेची हत्या केल्याचा आरोप तिच्या सासरच्यांवर आहे. मृत विवाहितेच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या मृत्यूबाबत एसपींकडे तक्रार केली असून आरोपी सासरच्या मंडळींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या या प्रकरणाची दखल घेत एसपींनी स्टेशन प्रभारींना गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. उत्तर प्रदेशातील बांदा येथे ही घटना घडली आहे.

हे प्रकरण नरैनी कोतवालीच्या मोतियारी गावातील आहे. मृत महिलेचे वडील विनोद तिवारी यांनी सांगितले की, २०१७ मध्ये त्यांनी मोतियारी गावात त्यांच्या मुलीचे लग्न केले होते. लग्नानंतर सासरचे लोक दोन लाख रुपये आणि दुचाकीची मागणी करत होते. मुलगी गरोदर होती.

पोराने नवरी शोधली, ९५ व्या वर्षी वडिलांचं दुसऱ्यांदा कबूल है, कारण वाचून कौतुक वाटेल
सासरच्या मंडळींवर खुनाचा आरोप करत वडिलांनी हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने माझ्या मुलीची हत्या केल्याचं म्हटलं आहे. जेव्हा तिचे सासरचे लोक तिला त्रास देत असत तेव्हा ती आम्हाला फोनवर सर्व काही सांगायची. पप्पा तुम्ही पोलिसात तक्रार करू नका, नाहीतर हे लोक मला मारून टाकतील, असं म्हणून ती आम्हाला तक्रार करु द्यायची नाही. मुलगी म्हणाली, पप्पा तुम्ही काळजी करू नका आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली.

वडिलांनी पुढे सांगितले की, मला ५ मुली आहेत. मी शेती करून उदरनिर्वाह करतो. एक-एक पैसा जोडून मी मुलीचे लग्न लावून दिले. पण, हुंडा न मिळाल्याने सासरच्यांनी मुलीची हत्या केली. मृत महिलेच्या मोठ्या बहिणीने सासरच्या लोकांवर हुंड्याबाबत गंभीर आरोप केले आहेत.

काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना

या प्रकरणी डीएसपी जियाउद्दीन अहमद यांनी सांगितले की, नरैनी पोलिस ठाण्यात एका विवाहित महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी मारहाण केली, त्यामुळे तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृताच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणाची तातडीने दखल घेत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासात जे काही सत्य समोर येईल त्याआधारे कारवाई केली जाईल.

प्रत्येक सुख-दु:खात सोबत देण्याचं वचन तिने निभावलं, एकाच सरणावर पती-पत्नीला मुखाग्नी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here