नवी दिल्ली: देशात विषाणूचा संसर्ग कमी न होता तो झपाट्याने वाढत चालला आहे. देशभरात शनिवारी करोनाचे सुमारे ७९,००० नवे रुग्ण आढळले आहेत. हे आतापर्यंत एका दिवसांत आढळलेले सर्वाधिक रुग्ण आहेत. या बरोबरच देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३५ लाखांच्याही पुढे गेली आहे. गेल्या आठवडाभरात देशात करोनाचे रुग्ण जलद गतीने वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

देशभरात गेल्या ७ दिवसांमध्ये एकूण ४ लाख ९६ हजार ०७० रुग्ण आढळले. अशा प्रकारे गेल्या ७ दिवसांमध्ये सरासरी ७० हजार ८६७ रुग्ण आढळले. गेल्या सात दिवसांमध्ये नोंद केलेली ही रुग्णांची संख्या जगात सर्वाधिक आहे. जुलैच्या उत्तरार्धात अमेरिकेत झालेल्या सर्वाधिक वाढीपेक्षाही अधिक आहे. देशातील एखाद्या राज्याविषयी बोलायचे झाल्यास, शनिवारी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले. महाराष्ट्रात काल शनिवारी १६ हजार ८६७ नवे रुग्ण आढळले. ही संख्या २६ ऑगस्टच्या रुग्णवाढीहून अधिक आहे. २६ ऑगस्टला महाराष्ट्रात १४ हजार ८८८ रुग्ण आढळले.

इतर राज्यांमध्ये देखील अशीच स्थिती आहे. आंध्र प्रदेश (१०,५४८, सतत चौथ्या दिवशीबी १० हजारांहून अधिक), कर्नाटक (८,३२४, गेल्या पाच दिवसांमध्ये ८ हजारांहून अधिक), तामिळनाडू (६,३५२) आणि उत्तर प्रदेशात (५,६८४) सर्वाधिक रुग्ण आढळले. तामिळनाडूत २९ जुलैनंतर पहिल्यांदाच रुग्णांचा आकडा ६ हजारांच्या पुढे गेला होता. गेल्या चार दिवसांमध्ये सक्रिय रुग्णांच्या संख्येत सुमारे ४९,००० ची वाढ झाली आहे. राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या पोहोचली आहे ७ लाख ६६ हजार २२६ इतकी झाली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

चिंताजनक वातावरणात सकारात्मक बाब

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी एकूण ६४ हजार ६८१ रुग्ण बरे झाले आहेत. अशा प्रकारे आतापर्यंत एकूण २७ लाख ६ हजार ८६१ रुग्ण बरे झाले आहेत. तर करोनामुळे शनिवारी ९४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या गेल्या पाच दिवसांमध्ये १००० पेक्षा कमी होती. महाराष्ट्रात एकूण १६ हजार ८६७ रुग्म आढळले. राज्यात २६ ऑगस्टला १४ हजार ८८८ रुग्ण आढळले होते. इतरकेच नाही, तर राज्यात सलग तिसऱ्या दिवशी ३२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत २४ हजार १०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, तामिळनाडूत ८७ रुग्ण दगावले.

क्लिक करा आणि वाचा-

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here