बुलढाणा : अधिक मासात जावयाला दिल्या जाणाऱ्या धोंडे जेवणासाठी जात असतानाच दाम्पत्याला अपघात झाला. या घटनेत विवाहितेच्या डोळ्यादेखतच पतीने प्राण सोडले. ही दुर्दैवी घटना बुलढाण्यातील सुलतानपूर येथे घडली आहे.

सध्या अधिक मास सुरु असल्याने विशेष करून जावयाला गोड धोंड्याचा पाहुणचार आणि पारंपारिक विधी करण्याच्या पद्धती रुढ आहेत. धोंडे जेवण करण्यासाठी दुचाकीने जाणाऱ्या दाम्पत्याला भीषण अपघात झाला.

बुलढाणा जिल्ह्यातील निमगाव तालुका नांदुरा येथील अनिता प्रल्हाद भोपळे (वय वर्ष ४५) आणि प्रल्हाद गणपत भोपळे (वय ४९ वर्ष) हे आपल्या हिरो दुचाकी क्रमांक MH21 E 5124 ने लोणार येथे भाऊ प्रवीण त्रंबक सातव यांच्याकडे धोंड्याच्या जेवणासाठी जात होते. सुलतानपूर जवळ मेहकरकडून येणाऱ्या भरधाव इंडिका कारने मागच्या दिशेने जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार प्रल्हाद भोपळे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. तर अनिता भोपळेही गंभीर जखमी झाली. सदर घटना सुलतानपूर मेहकर रोडवर मंगळवारी 8 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली.

भावोजी, ताई तुम्हाला संपवणारे; मुंबईतील सराफाला मेहुणीने क्लीप पाठवली, काही दिवसातच…
यावेळी उपस्थितांनी जखमींना मेहकर येथील दवाखान्यात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी पती प्रल्हाद भोपळे यांना मृत घोषित केले. तर जखमी पत्नीवर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती अपघातस्थळी पोहोचलेल्या नागरिकांनी अपघातग्रस्त दाम्पत्याच्या मोबाईलवरुन नातेवाईकांना दिली.

चालकाचं नियंत्रण सुटलं, जालना-पुसद बस कोसळली; २२ प्रवासी जखमी

सध्या सुरु असलेल्या अधिक मासात घडलेल्या या दुर्दैवी अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत प्रल्हाद भोपळे हे आपल्या पत्नी अनिताच्या माहेरी लोणार येथे धोंड्याच्या कार्यक्रमासाठी जात होते. आणि त्यावेळेस हा दुर्दैवी अपघात घडला आहे.

टोमॅटो विकून ४० लाख कमावले, कोट्यधीश होण्याचा विश्वास; शेतकरी म्हणतो, आता फक्त गृहलक्ष्मी हवी
मृत भोपळे यांचे मेहुणे प्रवीण त्रंबक सातव यांच्या तक्रारीवरून इंडिका विस्टा क्रमांक MH 28 v779 कारच्या चालकाविरुद्ध भादंवि कलम 219, 304 ए, 337, 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मेहकर पोलीसचे दुय्यम ठाणेदार शरद आहेर, रामेश्वर कोरडे जाधव, नागरे करीत आहेत.

माकडाने दरीत फेकलेल्या पर्समध्ये होते ३५ हजार, जीव धोक्यात घालून ‘ते’ २०० फूट उतरले, अन्…
रस्ते अपघातांचे सत्र थांबता थांबण्याचे नाव घेत नाही आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागील २४ तासात तीन जणांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. मुख्यतः तिन्ही जण हे दुचाकीस्वार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्गाच्या अपघातांसोबत अंतर्गत शहरालगतच्या गावाला जोडणाऱ्या मार्गांवर देखील अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here