सुधीर कुमार/ नोएडा: उत्तर प्रदेशातील येथील नॉलेज पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील महिलेला दिल्लीला नेऊन तिच्यावर केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेच्या मित्राने तिला दिल्लीच्या सराय काले खां येथे नेले. त्याच्यासोबत आणखी एक साथीदार होता. मित्रासह त्याच्या दोन साथीदारांनी तिच्यावर अत्याचार केले. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, २४ वर्षीय पीडित महिला ही मूळची कानपूरची रहिवासी आहे. नॉलेज पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही महिला राहते. शनिवारी सकाळी गावातच राहणारा महिलेचा मित्र तिच्या घरासमोर आला. तिला कारमध्ये बसवले. त्याच्यासोबत त्याचा अन्य एक मित्र होता. ते दोघेही तिला दिल्लीला घेऊन गेले. महिलेला दिल्लीतील सराय काले खां येथे आपल्या मित्राच्या फ्लॅटवर घेऊन गेले. तेथे तिघांनी तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप आहे.
या प्रकरणी पीडित महिलेने नॉलेज पार्क पोलीस ठाण्यात तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तातडीने दखल घेऊन या घटनेची नोंद करून घेतली आहे. या घटनेचा तपास केला जात आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times