नांदेड: गुप्तधनाची लालच आश्रम शाळेतील एका शाळेतील मुख्याध्यपक आणि लॅब टेक्नीशन सह इतर लोकांना चांगलीच महागात पडली आहे. जादूटोना करत गुप्तधन शोधणाऱ्या टोळीला कंधार पोलिसांनी अटक केली आहे. गावाकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी या गुप्तधनाचा पर्दाफाश केला आहे. कंधार तालुक्यातील भोजुचीवाडी येथील हा अघोरी प्रकार असून पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी अनिल कामाजी कावळे, शेतमालक नामदेव तुकाराम देवकते (रा. भोजूचीवाडी), धन दिसणारा मांत्रिक देवदास संभाजी नागठाणे, छायाबाई राजू जोंधळे, संजय जळबाजी पुय्यड, मुखतार अब्दुल खादर शेख, शाळेचे मुख्याध्यापक संभाजी रामजी कागणे यांना अटक करण्यात आली आहे. कंधार तालुक्यातील भोजूचीवाडी शिवारात नामदेव तुकाराम देवकते यांचे शेत आहे. यांच्या शेतात गुप्त धन असल्याची अनिल कावळे यांनी अनिल कावळे आणि माहिती मांत्रिक देविदास नागठाणे यांनी दिली होती. त्यानुसार सहा ते सात जणांनी शेतात गुप्तधन शोधण्याची तयारी सुरु केली.

अष्टमुखी पशुपतीनाथ मंदिराच्या दानपेटीत खजिना सापडला, परदेशी चलन, दागिने अन् लाखो रुपये
त्यानुसार, शेतात खड्डा करून अघोरी पुजा करत होते. या अघोरी प्रकाराची कुणकुण गावातील काही नागरिकांना मिळाली. त्यानंतर त्यांनी ११२ नंबर डायल करून कंधार पोलिस ठाण्याला माहिती दिली. घटनास्थळी पोलिस येईपर्यंत गावकऱ्यांनी त्यांना पकडून ठेवले होते. त्या ठिकाणी एक खड्डा खोदण्यात आला होता. लिंबु, नारळ आणि देवाची पूजा मांडली होती. पोलिसांनी पूजेचे साहित्यासह कार, मोबाईल जप्त केले आहे.

काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना

विशेष म्हणजे गुप्त धन शोधण्यासाठी जात असतात. कारचे डिझेल संपले होते, तेव्हा शाळेचे मुख्याध्यापक संभाजी रामजी कागणे यांनी डिझेल आणून दिले होते. पोलिसांनी मुख्याध्यापकाला देखील अटक केल्याची माहिती आहे. यातील एक आरोपी हा आश्रम शाळेत लॅब असिस्टंट आहे. या प्रकरणी कंधार पोलिसांनी जादूटोना प्रतिबंध कायद्यान्वे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक आदित्य लोणीकर करीत आहेत. या घटनेने कंधार तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

पायलट बाप दारु ढोसत होता, ११ वर्षांच्या पोराकडे विमानाची कमान, क्षणात होत्याचं नव्हतं, VIDEO समोर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here