मुंबई : सुप्रसिद्ध लेखक प्राचार्य हरी नरके यांचं बुधवारी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांनी मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात वयाच्या ६०व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

हरी नरके यांना एकुलती एक मुलगी आहे. हरी नरके यांची लेक मराठी सिने इंडस्ट्रीतील पॉप्युलर अभिनेत्री आहे. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून घराघरात पोहोचलेली हेमा ही हरी नरके यांची मुलगी प्रमिती नरके आहे. सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत तिने साकारलेल्या हेमा या पात्राला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली.

Hari Narke : महात्मा फुले यांच्या विचारांसाठी आयुष्य वेचलेले ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन
सुंदरा मनामध्ये भरली ही प्रमितीची पहिलीच मालिका नाही. याआधी तिने तु माझा सांगाती या मालिकेत अवलीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेलाही प्रेक्षकांनी चांगली दाद दिली होती.

ज्येष्ठ विचारवंत, फुले साहित्याचे अभ्यासक प्रा. हरी नरके यांचं निधन, समतेच्या चळवळीचा आघाडीचा शिलेदार हरपला

प्रमितीचा जन्म पुण्यात झाला. अभिनव विद्यालयात तिने शालेय शिक्षण घेतलं, तर फर्ग्युसन कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेतलं. तसंच पुण्यातील ललित कला केंद्रातून तिने अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईत आली. अनेक मालिका, चित्रपटांसाठी ती ऑडिशन देत होती. यादरम्यान ती नाटकांमध्येही काम करत होती. नाटकांमध्ये काम करताना तिला तु माझा सांगाती मालिकेतून ब्रेक मिळाला.


प्रमितीने नाटक, मालिकांसह शॉर्ट फिल्म्समध्येही काम केलं आहे. डोह या तिच्या शॉर्ट फिल्मसाठी तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.


दरम्यान, हरी नरके यांनी त्यांच्या ब्लॉगमध्येही आपल्या लेकीबद्दलच्या काही आठवणी लिहिल्या होत्या. हरी नरके यांना आपल्या मुलीचा अतिशय अभिमान आहे. त्यांनी त्यांच्या एका ब्लॉग पोस्टमध्ये अशा गुणी, बुद्धीमान, चोखंदळ मुलीचा बाप असणं ही किती भाग्याची गोष्ट आहे हे अभिमानाने लिहिलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here