पुणे : यंदाच्या वर्षी अधिक आणि श्रावण महिना एकत्र आल्यामुळे तीर्थक्षेत्रावर गर्दी होताना पहायला मिळत आहे. आंबेगाव तालुक्यात बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेले पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर येथेही भाविकांची मोठी गर्दी होत आहे. अधिक महिना संपल्यानंतर श्रावण महिना सुरू होत असल्याने आणखी गर्दी होणार आहे. त्यामुळे भीमाशंकर देवस्थानकडून मंदिर परिसरात मोबाइल वापरास बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
पंच प्रण शपथ घेण्यासाठी निघालेल्या वाहतूक पोलिसाला हायवा गाडीची धडक…! अन् क्षणात सगळं संपलं
सध्या भाविकांची मंदिरात मोठी गर्दी होत आहे. अधिक श्रावण महिना सुरू असल्यामुळे ही गर्दी होत आहे. त्यानंतर सुरू होणाऱ्या श्रावणात ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिर परिसरात मोबाइल वापराला बंदी घालण्यात आली आहे. भीमाशंकर हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे अनेक भाविक या ठिकाणी दाखल होत असतात.
Pune News: पुण्यातील या गावाला भूस्खलनाचा धोका? डोंगरावर ३०० मीटरची लांब भेग
श्रावण महिन्यात दरवर्षी राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे दरवर्षी श्रावण महिन्यात भीमाशंकर येथे भाविकांची मोठी गर्दी असते. गर्दीत अनेक अनुचित प्रकार घडत असतात. त्याचा त्रास मंदिर प्रशासनाला सहन करावा लागतो. मात्र यंदाच्या वर्षी मंदिर प्रशासनाकडून सर्वानुमते मंदिर परिसरात मोबाइल बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नितीन देसाई आत्महत्या प्रकरण: आरोपीची नऊ तास चौकशी, पुन्हा ११ ऑगस्टला हजर राहण्याची नोटीस

भाविकांनी गाभारा, मुख्य मंडप आणि मंदिर परिसरात फोटो काढू नयेत, तसेच मोबाइल बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. या आदेशाचे कुणी उल्लंघन केले तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here