ठाणे (डोंबिवली) : डोंबिवलीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका व्यक्तीने उसने पैसे घेतले होते. ते पैसे मागण्यासाठी एक व्यक्ती घरी आला. मात्र, पती घरी नसल्याचे घरातील महिलेने सांगताच संतापलेल्या व्यक्तीने पत्नीच्या डोक्यात हातोडा घातला. एवढंच नाही तर इंजेक्शनसारखी टोकदार वस्तू तिच्या मानेला टोचून तिला गंभीर जखमी केले आहे. दरम्यान, जखमी महिलेने राजीव भुयान याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरुन टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

अशी घडली घटना….

डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी परिसरात ममताराणी या परिवारासह राहतात. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास राजीव हा महिलेच्या घरी आला. त्याने महिलेला सांगितले की “तुमच्या पतीने उसणे पैसे घेतले आहेत. ते पैसे मला परत करा”, अशी मागणी केली. महिलेने “पती घरी नाहीत, ते आले की पैसे देऊ”, असे राजीव याला सांगितले. याचा राग आल्याने राजीव याने संतापाच्या भरात महिलेला मारहाण केली. त्यानंतर राजीवने त्याच्या पिशवीतील हातोडा काढून तो डोक्यात मारला. या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली. एवढेच नाही तर नंतर राजीवने इंजेक्शनसारखी टोकदार वस्तू काढून त्या महिलेच्या मानेला टोचली आणि नंतर तेथून पळ काढला.

सव्वा कोटींच्या दंडाचं प्रकरण, १५ लाखांच्या लाचेची मागणी, तहसीलदार रंगेहात सापडला, विभागीय आयुक्तांनी दणका दिला
गंभीर जखमी ममताराणी यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. त्यांच्या तक्रारीवरुन टिळकनगर पोलीस ठाण्यात आरोपी राजीव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस राजीवचा शोध घेत आहेत.

बच्चू कडू पुन्हा आक्रमक, शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा पाढा वाचला, शिंदे सरकारवर प्रहार, मोर्चाद्वारे ताकद दाखवली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here