: पत्नीची हत्या करुन पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेल्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. काही जण पत्नीला चोर म्हणायचे. त्यामुळे पती नाराज झाला होता. त्याशिवाय त्याच्या डोक्यावर ११ लाख रुपयांचं कर्ज होतं. त्याची परतफेडही त्याला जमत नव्हती. त्यामुळे त्यानं पत्नीला संपवून आत्महत्या करण्याचं ठरवलं. त्यानं पत्नीची हत्या केली. मात्र त्यानंतर त्याला आत्महत्या करणं जमलं नाही. स्वत:ला संपवण्यासाठी त्याला धीर एकवटता आला नाही. त्यामुळे त्यानं आत्मसमर्पण केलं आणि पोलिसांना घडलेली घटना सांगितली.सरिता (३५) आणि थरानाथ (३७) मूळचे मंगळुरुचे रहिवासी होते. काही महिन्यांपूर्वीच दोघे बंगळुरूत स्थायिक झाले. मंगळुरुत असताना सरितावर चोरीचा आरोप झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. सरिताला चोर म्हणून हिणवलं जात असताना दोघे बंगळुरुत आले. पण तिथेही जोडप्याच्या ओळखीचे काही जण राहत होते. ते सरिताला चोर म्हणून हिणवायचे. त्यामुळे दोघेही वैतागले होते.थरानाथच्या डोक्यावर ११ लाखांचं कर्ज होतं. त्याची परतफेड करणं त्याला जमत नव्हतं. तो बंगळुरूत पाणीपुरीचं दुकान चालवायचा. पत्नीला मिळणारी वागणूक आणि डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर याला कंटाळून त्यानं सरितासह स्वत:ला संपवण्याचं ठरवलं. मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यानं सरिताची दोरीनं गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तो तिच्या मृतदेहाजवळ काही तास बसून राहिला. त्यानं स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा धीर झाला नाही. त्यानं घरमालकाशी संपर्क साधला आणि घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यानं पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. सरिता झोपलेली असताना तिची हत्या केल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here