मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण लखनऊच्या बीबीडी पोलिस स्टेशन हद्दीतील तिवारीगंजमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. वडील हरीश साहनी आणि आई माया हरदोई संदिला येथे खाजगी काम करायचे. आईने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी मुलाचा व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आला. तो वाचताच आम्ही खूप घाबरलो आणि त्याला अनेकवेळा फोन केले. पण, त्याने फोन घेतले नाही. जेव्हा आम्ही त्याच्या खोलीजवळ पोहोचलो तेव्हा ती आतून बंद होती.
घरमालकाने बराच वेळ दार उघडले नाही. तब्बल दोन तास दार न उघडल्याने पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली, असे नातेवाईकांनी सांगितले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडला असता मुलाचा मृतदेह फासावर लटकलेला दिसला. जीव देण्यापूर्वी मुलाने Thank You Mummy Papa For Everything I’m Sorry (मम्मी-पप्पा सगळ्या गोष्टींसाठी थँक्यू मला माफ करा) असा मेसेज पाठवला होता.
घरमालकाने दरवाजा न उघडल्याचा आरोप
पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असले तरी घरमालकाने वेळीच दरवाजा उघडला असता तर मुलाचे प्राण वाचले असते, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत घरमालकाची उपस्थितीही संशयास्पद आहे. एडीसीपी ईस्ट झोन सय्यद अली अब्बास यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने सुसाईड नोट लिहिली होती आणि नंतर गळफास घेत त्याने आत्महत्या केली. या प्रकरणाचीही चौकशी सुरू असून, जे काही तथ्य समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.