मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश सुर्वेंचा मुलगा राज सुर्वे यांच्यासह दहा ते बारा जणांविरुद्ध गोरेगाव येथील वनराई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. व्यावसायिकाच्या कार्यालयात घुसून त्याला मारहाण करत सुर्वेंसह बारा जणांनी त्याचे अपहरण केल्याचा आरोप आहे.

मुंबई पोलिसांनी शिवसेना (शिंदे गट) आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी गोरेगाव पूर्व परिसरातून व्यापारी राजकुमार सिंह यांचे खंडणीसाठी अपहरण केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बंदुकीच्या धाकावर व्यापाऱ्याचे अपहरण केल्याचा आरोप आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

प्रेम विवाहाला विरोध, प्रियकराच्या साथीने पोटच्या मुलीने दिली वडिलांची सुपारी, पण…
गोरेगाव येथील ग्लोबल म्युझिक जंक्शन कार्यालयात सुमारे १० ते १५ जण घुसले. म्युझिक कंपनीचे सीईओ राजकुमार सिंह यांचे अपहरण केल्याचा दावा करण्यात येत आहे. या घटनेचे एक सीसीटीव्ही कॅमेरा फूटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये १० ते १५ जण कर्मचार्‍यांना शिवीगाळ करत असल्याचं बोललं जातं. तर एका व्यक्तीला जबरदस्तीने सोबत नेतानाही दिसत आहे.

हरिश्चंद्र गडावर वाट चुकलेल्या पर्यटकाचा मृत्यू नेमका कशामुळे, अंगावर काटा आणणारं कारण समोर
तक्रारदार राजकुमार सिंग यांच्या आरोपानुसार, त्यांना त्यांच्या कार्यालयातून जबरदस्तीने उचलून नेण्यात आलं. पाटणा येथील मनोज मिश्रा यांना दिलेल्या व्यावसायिक कर्जाची सेटलमेंट करण्यासाठी त्यांच्यावर बंदुकीच्या जोरावर दबाव आणण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

प्रकाश सुर्वेंचा व्हिडिओ ३२ देशातील लोकांनी पाहिला, मीच १० लोकांना फॉरवर्ड केला | अंबादास दानवे

“राजकुमार यांना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या दहिसर येथील कार्यालयात नेण्यात आले, तिथे आमदारपुत्र राज सुर्वे आणि त्यांच्या साथीदारांनी सिंग यांना बंदुकीच्या जोरावर हे प्रकरण मिटवण्याची आणि त्याबद्दल कुठेही वाच्यता न करण्याची धमकी देण्यात आली” असं वृत्त एएनआयने एफआयआरच्या हवाल्याने दिले आहे.

‘मला तू खूप आवडतेस, माझ्या…’ पुण्यात ३० वर्षीय महिला कंडक्टरचा विनयभंग, सहकाऱ्याला अटक
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी या घटनेवरून शिंदे गटावर हल्लाबोल केला. “देशद्रोही टोळीचे नवरत्न” अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here