अहमदनगर: यंदाच्या वर्षी श्रावण महिन्यात अधिकमास आलेल्या आहे. त्यामूळे सर्वत्र वेगळा उत्साह पाहायला मिळतो आहे. श्रावण महिन्यात अनेक जण शंकराची आराधना करतात. त्यामुळे आपसूकच शिव भक्तांची पावलं भगवान शंकर यांच्या दर्शनासाठी मंदिराकडे वळतात. अशातच आता चोरट्यांची नजर देखील मंदिरावर आहे. मंदिरातली चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. ही घटना पाथर्डी तालुक्यात घाटशिरस येथील गर्भगिरीच्या पायथ्याशी असलेल्या श्रीक्षेत्र वृद्धेश्वर मंदिरातील आहे. येथे चोरट्यांनी मंदिरातील चार दानपेट्या चोरुन नेल्या आहेत.

अज्ञात चार ते पाच चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून मंदिरातील चार दानपेट्या उचलून नेत त्यातील रक्कम लंपास केली आहे. हे अज्ञात चोरटे मंदिराच्या सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यात कैद झाले आहे. घाटशिरस येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मंदिराच्या पाठीमागून येऊन अज्ञात चार ते पाच चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचा कडी कोयंडा साखळी तोडली. त्यानंतर त्यांनी मंदिरातील चार दानपेट्या उचलून नेल्या. त्यानंतर त्यांनी मंदिराच्या पाठीमागील नदीजवळ या दानपेट्या तोडल्या आणि त्यातील रक्कम लंपास केली.

उत्खननात मुलीला सापडला १५०० वर्ष जुना जादूचा आरसा, पाहा कसा दिसायचा, वापर ऐकून चक्रावाल
मंदिरात चोरी करण्यासाठी आलेले अज्ञात चोरटे सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात ज्या ठिकाणी स्वयंभू आदिनाथांचे शिवलिंग आहे त्या ठिकाणी असलेली दानपेटी मात्र चोरट्यांना तोडता आली नाही. त्यामुळे त्यांनी ती दानपेटी तिथेच ठेवली आणि इतर बाहेरच्या चार दानपेट्या उचलून नेत त्यातील रक्कम चोरून नेली.

दानपेटीतील नोटा चोरट्यांनी नेल्या, मात्र चिल्लर दानपेटीतच ठेवून चोर पसार झाले आहेत. ही घटना दुसऱ्या दिवशी पहाटे पुजारी आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांना याबाबत कळवण्यात आले. या घटनेबाबत माहिती मिळताच पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक योगेश राजगुरू, सहाय्यक पोलीस निरीक्षक कोशल्यनिरंजन वाघ यांच्यासह स्वानपथक तसेच ठसेतज्ञ तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पुढील तपास सुरू केला.

प्रेमात अडथळा, आईसोबत सतत भांडण; मुलीनं आई अन् प्रियकराच्या मदतीने वडिलांचा काटा काढला

वृद्धेश्वर येथे दानपेट्या फोडून चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा तपास करून अटक करू, असं आश्वासन घाटशिरस ग्रामस्थ आणि भाविकांना पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दिले असून वृद्धेश्वर येथे झालेल्या चोरीच्या घटनेचा भाविक भक्तांकडून देखील तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. कठोरात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

बहिणीची भेट ठरली अखेरची, रक्षाबंधनच्या २० दिवसांपूर्वी अघटित, तीन भावांनी एकत्र जीव गमावला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here