रायपूर: प्रेमी युगुलात वाद होताच प्रेयसी हायटेन्शन टॉवरवर चढल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. प्रेयसी टॉवरवर चढताच तिची समजूत काढण्यासाठी प्रियकरही तिच्या पाठोपाठ टॉवरवर चढला. छत्तीसगडच्या गौरेला-पेण्ड्रा-मरवाही जिल्ह्यातील या घटनेची सर्वत्र चर्चा झाली. आता या घटनेमागची गोष्ट उघडकीस आली आहे.
जिल्ह्याच्या नेवरी गावात राहणाऱ्या अनिताचा विवाह ६ वर्षांपूर्वी झाला. लग्नानंतर ४ वर्ष सगळं व्यवस्थित सुरू होतं. अनिताला एक मूल झालं. मात्र त्यानंतर पती पत्नीमध्ये वाद झाले. त्यानंतर अनिता मुलाला पतीजवळ ठेवून गौरेलातील तिच्या माहेरी परतली. अनिता एका दुकानात काम करू लागली. तिथे तिची ओळख एका तरुणाशी झाली. दोघांमध्ये संवाद सुरू झाला. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांना लग्न करायचं होतं.
अनिताच्या प्रेम कहाणीत एक नाट्यमय वळण आलं. दोघांमध्ये वहिनी-दिराचं नातं असल्याचं त्यांना समजलं. अनिताचा प्रियकर तिच्या पतीच्या आत्येभाऊ होता. प्रियकर सोडून गेल्यास एकटी पडण्याची भीती तिला वाटत होती. यावरुन दोघांमध्ये सातत्यानं वाद होऊ लागले. याच वादातून अनिता आत्महत्या करण्यास हायटेंशन लाईनच्या टॉवरवर चढली.

आमचं एकमेकांवर नितांत प्रेम आहे. आम्हाला एकमेकांपासून वेगळं होण्याची इच्छा नाही. सत्य समोर आल्यानंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थ आम्हाला वेगळं करतील. मी आधीच विवाहित असल्यानं आमची ताटातूट होईल, अशी भीती वाटल्यानं टॉवरवर आत्महत्या करण्यासाठी चढले होते, असं अनितानं सांगितलं.
संतापाच्या भरात अनिताला ओरडलो. त्यामुळे ती नाराज झाली आणि टॉवरवर चढली, असं तिच्या प्रियकरानं सांगितलं. तिला खाली आणण्यासाठी बऱ्याच मिन्नतवाऱ्या कराव्या लागल्या. खाली उतरल्यानंतर मी टॉवरकडे पाहिलं आणि इतक्या उंचीवर कसा चढलो, असा प्रश्न मला पडला. याआधी कधी मी झाडावरही चढलेलो नव्हतो, असं प्रियकर म्हणाला. पोलीस पकडून मारतील या भीतीनं पळून गेलो होतो, असं त्यानं सांगितलं.