अलिबाग, रायगड : रायगडमध्ये रस्त्याची अवस्था वेगळी सांगायला नको. त्यातच पेण – पनवेल रस्ताही खड्ड्यांमध्ये गुडूप झाला आहे. रस्त्याच्या एका लेनचे काम सुरू असल्याने बहुतांशी वाहतूक एका लेननेच सुरू आहे. अशा रस्त्यावरून वाहन चालकांना वाहने हाकताना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. मात्र याची चिंता तंबाखू बहाद्दर चालकांना पडल्याचे दिसून येत नाही.
चाकरमान्यांना गुड न्यूज! मुंबई-गोवा हायवेची एक लेन गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचे प्रयत्न
ठाण्याहून अलिबागकडे जाणारी एसटी महामंडळाची बस (बुधवार, दिनांक ०९ ऑगस्ट रोजी) संध्याकाळी ५.०० च्या दरम्यान याच मार्गावरून जात होती. प्रवाशांनी खचाखच भरलेली अशी ही बस होती. पनवेल डेपोतुन बस बाहेर पडली आणि थोड्याच वेळात पळस्पे – पेण हायवेवरती प्रवास करत असताना एसटी बसचा चालक बेदरकारपणे स्टेअरिंगवरील आपले दोन्ही हात सोडले. आणि हातात गुटका मळताना दिसून आला. संतप्त प्रवाशांनी त्याचे हे कृत्य आपल्या कॅमेरात कैद केलं. राज्यात गुटखा बंदी असताना सुद्दा हा उन्मत्त बसचालक बिनधास्त गुटका खाताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
Raigad News: कोकणातील ‘या’ गावात भूगर्भातून येतायत विचित्र आवाज, यंत्रणा धास्तावल्या, प्रशासन हाय अलर्टवर
मुंबई – गोवा हायवे खड्ड्यांमुळे गाजत असतानाच खड्डे चुकवताना जीवघेणे अपघात होत आहेत. त्यामध्ये एसटी बसचा चालक प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर सोडून आपले घाणेरडे छंद जोपासत आहेत. प्रवाशांनी भरलेल्या बसचा चालक दोन्ही हात सोडून वाहन हाकत असेल तर मोठा अपघात होण्याचा धोका संभवतो. अशा नशाबहाद्दर चालक आणि वाहक यांच्याकडे महामंडळाने वेळीच लक्ष द्यावे. यांना धडा शिकवावा अशी मागणी प्रवसी करत आहेत.

मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था, भजन म्हणत पत्रकारांचं आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here