मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, यूएफओ आयडेंटिफाइड या स्पॉटर वेबसाइटवर एकूण ९५७ यूएफओ पाहिल्याचं सांगण्यात आलं आहे. बहुतेक यूएफओ हे ग्लासगो परिसरात दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. २०२१ मध्ये ४१०,२०२२ मध्ये ४९४ आणि यावर्षी २० मे पर्यंत ५३ अशा घटना घडल्या आहेत. यापैकी २५ टक्के भागात ताऱ्यासारखी वस्तू दिसली, जी आकाशात फिरत होती. १७ टक्के गोल आकाराची वस्तू दिसली, १० टक्के वर्तुळाकार आणि ९ टक्के सिलेंडरच्या आकाराची वस्तू दिसली.
या वेबसाइटशी संबंधित अॅश एलिस यांनी सांगितले की, असे देखील होऊ शकते की अनेक यूएफओ घटना अशा असतील की त्या रेकॉर्ड केल्या गेल्या नसतील. अमेरिकन काँग्रेसचे माजी हवाई दलाचे गुप्तचर अधिकारी निवृत्त मेजर डेव्हिड ग्रुश यांनी इतर जगाशी संपर्काच्या संभाव्य पुराव्यांबद्दल सांगितले, तेव्हा ही माहिती समोर आली. ते म्हणाले की, अमेरिका ही दीर्घकाळ चाललेला प्रोग्राम लपवत आहे. ज्या अंतर्गत अज्ञात उडणाऱ्या वस्तुंचे रिव्हर्स इंजिनीअरिंग केले जाते.
ग्रश यांच्या या वक्तव्यांनी वादळ निर्माण केले आहे. तेव्हापासून, शास्त्रज्ञांना संशय आहे की अमेरिकेला गुप्तपणे इतर ग्रहावर जीवनाचे पुरावे सापडले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला एका शास्त्रज्ञाने असा दावा केला होता की, एलियन्स सूर्यमालेच्या बाहेर गडद ठिकाणी लपलेले असू शकतात. त्यांचा शोध घेता येऊ नये यासाठी ते कदाचित टर्मिनेटर जोन्सचा वापर करत असतील. या प्रदेशांमध्ये ‘स्वीट स्पॉट्स’ देखील समाविष्ट आहेत, जिथे ग्रह आपल्या सूर्यमालेच्या बाहेरील ताऱ्यांभोवती फिरत असतात. याचा अर्थ त्यांची एक बाजू दिसते, तर दुसरी बाजू नेहमी अंधारात असते.
कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या डॉ. अॅना लोबो यांनी सांगितले की, ‘दिवसाची वेळ ही अति उष्ण असू शकते, अशा परिस्थितीत जगणे शक्य नाही. तर रात्रीची वेळ ही अत्यंत थंड किंवा पूर्णपणे बर्फाच्छादित असू शकते. त्यामुळे आपल्याला अशा ग्रहाची आवश्यकता आहे जो स्वीट स्पॉटमध्ये असेल आणि त्यावर पाण्याच्या द्रव स्वरुपासाठी योग्य तापमान असेल. आम्ही त्या ग्रहांकडे लक्ष केंद्रीत करुन आहोत ज्यावर मर्यादित पाणीसाठा असेल. यावर अथांग पसरलेले महासागर नसून तलाव किंवा पाण्याचे लहान स्त्रोत असतील. हे हवामान खरोखरच खूप आशादायक असू शकते. अशा प्रकारचं वातावरण जर आपण शोधू शकलो तर नक्कीच आपण येणाऱ्या भविष्यात राहण्यायोग्य ग्रह असल्याच्या शक्यता वाढू शकतात’.