चिपळूण, रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील नीलिमा चव्हाण हिचा घातपात नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली असतानाच आता आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Nilima Chavan Death Case: पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, निलिमाचा मृत्यू घातापाताने नाही तर…
नीलिमा चव्हाण ही ज्या एका मोठ्या राष्ट्रीयकृत बँकेच्या दापोली शाखेत कंत्राटी पद्धतीने काम करत होती त्याच बँकेतील एक कर्मचारी तिच्यावर वारंवार कामासाठी दबाव टाकत होता, अशी माहिती तिच्या नातेवाईकांनी जिल्हा पोलीस प्रशासनाकडे दिली आहे. या प्रकरणाचा तपास सगळ्या बाजूने जिल्हा पोलीस प्रशासन कसून करत आहे. या प्रकरणामध्ये आता या बँकेच्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
Nilima Chavan News : डोकं अन् भुवयांवरील केस नव्हते कारण…; नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणी पोलिसांची धक्कादायक माहिती
नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी व्हिसेरा रिपोर्ट येण्याची वाट पोलीस प्रशासन पाहत आहे. हा रिपोर्ट येताच या मृत्यू प्रकरणाच्या पुढील तपासाला दिशा मिळण्याची शक्यता आहे. दापोली येथून आपल्या गावी निघालेली नीलिमा चव्हाण ही खेड चिपळूण एसटीत बसल्यानंतर ती गावी पोहोचलीच नाही. त्यामुळे ती बेपत्ता झाल्याची तक्रार घरच्यांनी पोलिसात दिली होती. त्यानंतर तीन दिवसांनी तिचा मृतदेह दाभोळ खाडीत मिळाला होता. याप्रकरणी तपासात आतापर्यंत घातपाताची कोणतीही प्राथमिक शक्यता पुढे आलेली नाही.

निलिमा चव्हाण हिच्या मृत्यू प्रकरणी घातपाताची शक्यता नाही, असा प्राथमिक निष्कर्ष पोलीस तपासात काढण्यात आला असला तरीही पोलीस या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणार आहेत. नीलिमा चव्हाण हिची मानसिक स्थिती ठीक नव्हती ही बाब पोलीस तपासात यापूर्वीच समोर आली आहे.

नीलिमा हिच्या घरची परिस्थिती ही अत्यंत बेताची अशीच आहे. नीलिमा हिने या सगळ्या परिस्थितीवर मात करूनही एमकॉमपर्यंत उच्च शिक्षण घेतले होते. यामुळेच तिला एका मोठ्या राष्ट्रीयकृत बँकेत काम करण्याची संधी मिळाली. पण ती कंत्राटी कर्मचारी होती. त्यामुळे आता तिच्यावर कोणता दबाव होता का? याची चाचपणी आता पोलीस प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. याच प्रकरणी नीलिमा चव्हाणच्या घरच्यांनी एका कर्मचाऱ्याचे नावही पोलीस प्रशासनाला सांगितले आहे. त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढील पोलीस तपासात कोणती वेगळी माहिती समोर येते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here