मोदींनी मणिपूरमधील जनतेला हे आश्ववासन दिले की संपूर्ण देश तुमच्या सोबत आहे आणि लवकरच तेथील परिस्थिती सामान्य होईल. मोदींना आपल्या भाषणात विरोधकांची नवी आघाडी INDIA वर देखील जोरदार हल्ला चढवला. तेव्हा जेव्हा विरोधक अविश्वास प्रस्ताव आणतात तेव्हा तेव्हा एनडीए आणि भाजपसाठी ते शुभ ठरते. काँग्रेस पक्षाकडे स्वत:चे असे काही नाही त्यांनी पक्ष, नाव, चिन्ह सर्व काही चोरले आहे अशी टीका मोदींनी यावेळी केली.
मोदींच्या भाषणानंतर अविश्वास प्रस्तावावर आवाजी मतदान झाले आणि हा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्यावर निलंबणाची कारवाई करण्याचा प्रस्ताव दिला जो सभागृहाने आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. चौधरी यांनी अविश्वास प्रस्तावावर मतदान करताना पंतप्रधान मोदींची तुलना नीरव मोदीशी केली होती. तसेच मोदींचे भाषण सुरू असताना देखील ते अधून मधून बोलण्याचा प्रयत्न करत होते.
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी असा ठराव मांडला की “या सभागृहाने अधीर रंजन चौधरी यांनी जाणीवपूर्वक आणि वारंवार केलेल्या गैरवर्तन करून सभागृहाची अवहेलना केली. अध्यक्षांच्या अधिकाराने त्यांच्या गैरवर्तनाचे प्रकरण समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. सभागृहाची विशेषाधिकार समिती आणि समिती अहवाल सादर करेपर्यंत अधीर रंजन चौधरी यांना सभागृहाच्या सेवेतून निलंबित करण्यात यावे.