नागपूर: खासदारपद बहाल झाल्यानंतर ९ ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांनी लोकसभेत पहिले भाषण केले. मात्र, दुपारी ३ वाजता राजस्थानमध्ये कार्यक्रम असल्याने उत्तर ऐकण्यासाठी ते सभागृहात थांबले नाही. लोकसभेतून बाहेर पडताना, त्यांनी २०१८ मध्ये पीएम मोदी सरकारविरुद्धच्या शेवटच्या अविश्वास प्रस्तावादरम्यानच्या त्यांच्या प्रसिद्ध मिठी आणि डोळे मिचकावल्याची आठवण करून दिली. तसेच बाहेर पडताना राहुल गांधींनी फ्लाइंग किस केले.
अपघातात पोलीस हवालदार ब्रेन डेड; कुटुंबाचा अवयवदानाचा निर्णय, तिघांना मिळाले जीवनदान
दरम्यान, भाजपच्या २२ महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाइंग किस दिल्याचा आरोप केला आहे. सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांची फैरी सुरू आहे. खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींना पाठिंबा दिल्यानंतर भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. देशासाठी प्रेम आणि जादूचे फ्लाइंग किस केले आहे. असे म्हणत संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना समर्थन दिले आहे. त्यावर सुधीर मुनगंटीवार राऊत यांचावर निशाणा साधला आहे.

ते म्हणाले की, यावर काय भाष्य करावं, कसं करावं, जे भ्रष्ट आहेत त्यांना असं बोलावं लागतं. सुधीर मुनगंटीवार यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधत, अशा लोकांपासून आम्हाला धोका आहे. ही व्यक्तिमत्त्वे लोकशाही आणि देशासाठी धोकादायक आहेत. शिवाय, उद्या जेव्हा तुम्ही तुमच्या माता-बहिनींना रस्त्याने जाताना असे फ्लाइंग किस करेल तेव्हा तुम्हाला कसे वाटेल? देशाच्या प्रेमासाठी केलंय असं म्हटलं तर चालेल काय? तुम्ही त्याचे समर्थन कसे कराल? काही लाज लज्जा आहे की नाही? मुनगंटीवार पुढे म्हणाले की, “विधानसभा आणि लोकसभेच्या काही प्रथा परंपरा आहेत. इथे तुम्हाला हवे ते करू शकत नाही. राहुल गांधीचे हे असभ्य कृत्य आहे. मोदीजी पुन्हा निवडून यावेत म्हणून राहुल गांधींनी हे कृत्य केले आहे. राहुल यांच्या तोंडात वेगळं आणि पोटात वेगळं काही आहे. फक्त मोदीजी जिंकावेत, अशी त्यांची आतून इच्छा आहे.

भाजप-शिवसेना युती तुटली त्यावेळी गिरीश महाजन अर्ध्या चड्डीवर फिरत होते, एकनाथ खडसेंकडून खरपूस समाचार

मुनगंटीवार पुढे म्हणाले की, जेव्हा कोणी सत्तेचा भुकेला असतो, तेव्हा तो नीच शब्द वापरतो आणि संस्कारही विसरतो. देशाचा पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहणारा आणि मनमोहन सिंग यांच्यासमोर कायद्याची पाने फाडणारा नेता कधी डोळा मारतो तर कधी मिठी मारतो. असे कृत्य करू नये. हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही माहीत आहे. असे काम करून राहुल यांनी जगासमोर देशाचे नाव आणि मान खाली आणली आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राहुल गांधींनी दिलेले ‘फ्लाइंग किस’ निवडणुकीत त्यांना फक्त फ्लाइंग बघायला मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here