नांदेड : जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात ऑनर किलिंगची घटना उघडकीस आली आहे. मुलीने इच्छे विरुद्ध लग्नाचा अट्टाहास केला. यामुळे जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोटच्या मुलीची क्रूरतेने हत्या केली. एवढचं नाही तर मृतदेह जाळून टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही केला.

मुखेड तालुक्यातील मनु तांडा येथे आठ दिवसांपूर्वी अंगावर शहारे आणणारी भयंकर घटना घडली. या प्रकरणी मृत मुलीच्या आईच्या फिर्यादी वरून मुक्रमाबाद पोलिसांनी आरोपी पित्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
पोटी तीन मुली; पती-पत्नी घरातून अचानक बेपत्ता, आता धक्कादायक माहिती आली समोर

माझी मुलगी आजारी होती. आजाराला कंटाळून तिने गळफास घेतला. त्यामुळे घाई गडबडीने तिचा अंत्यविधी केल्याचा बनाव आरोपी वडिलांकडून केला जात होता. अखेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत हत्येचा उलगडा केला.

Video: मरणानंतरही नरक यातना! रस्ता नसल्याने मृतदेह चक्क झोळीतून नेण्याची आली वेळ
कशी घडली घटना?

मृत मुलगी ही १६ वर्षांची होती. मुखेड तालुक्यातील राजुरा तांडा येथील नातेवाईकातील एका मुलाशी तिचे प्रेम संबंध होते. ही बाब माहिती झाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी विरोध केला. तरीही मुलीने नातेवाईकातील त्या मुलासोबत लग्न करण्याचा तगादा लावला होता. याचाच राग मनात धरून २ ऑगस्टला सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास आरोपी पित्याने राहत्या घरी कोयत्याने मुलीच्या मानेवर आणि हातावर वार केले. रक्तबंबाळ झालेल्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने मुलीचा मृतदेह शेतात नेऊन जाळून टाकला. त्यानंतर घरातील रक्ताचे डाग पाण्याने पुसले आणि कोयता ऊसाच्या शेतात फेकून दिला. या घटनेबद्दल माहिती दिल्यास पत्नीला जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिली होती.

मोटार सायकलला जोडलं वखरणी यंत्र, साडे तीनशे रुपयात शेतकऱ्याचा जुगाड

मृत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पोलिसांनी अटकही केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके हे करत आहेत. पित्याने आपल्याच मुलीची एवढ्या क्रूरतेने हत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

अशी उघडकीस आली घटना

मुलीच्या मृत्यूनंतर गावात विविध चर्चांना उधाण आलं होतं. पोलिसांनाही संशय आला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. घटनेचा उलगडा करण्याचं मुक्रमाबाद पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. पोलिसांनी अनेक गोपनीय जवाब नोंदविले. ९ ऑगस्टला तांड्यातील काही लोकांना ताब्यात घेऊन चौकशी केली. ज्या ठिकाण मुलीला जाळण्यात आले, त्या ठिकणी जाऊन हाडाचे नमुने आणि राख प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवली. त्यानंतर मृक मुलीच्या आईला ताब्यात घेऊन चौकशी केली आणि ऑनर किलिंगचा प्रकार समोर आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here