नाशिक: चार्टर्ड अकाउंट्‌स, अकाउंट्‌स ऑफ इंडिया (ICAI) यांच्‍यातर्फे सनदी लेखापाल अभ्यासक्रमातील सीए फाउंडेशन शिक्षणक्रमाची परीक्षा जूनमध्ये घेण्यात आली होती. या सीए फाउंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत नाशिकची कन्या दिशा सचिन गुजरानी हिने ३६८ गुण मिळवत राष्ट्रीय पातळीवर पहिला क्रमांक पटकाविला आहे. या परीक्षेत नाशिक मधील तब्बल ३३० विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णांची टक्‍केवारी २५.६२ इतकी आहे.
अपघातात पोलीस हवालदार ब्रेन डेड; कुटुंबाचा अवयवदानाचा निर्णय, तिघांना मिळाले जीवनदान
सर्व विक्रम मोडीत काढताना दिशा गुजरानी हिने राष्ट्रीय क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. दिशाने प्रिन्‍सिपल्‍स ॲन्ड प्रॅक्‍टिस ऑफ अकाउंटिंगमध्ये ९५ गुण, बिझनेस लॉ ॲन्ड बिझनेस करस्‍पॉन्‍डन्‍स ॲन्ड रिपोर्टिंगमध्ये ७९ गुण, बिझनेस मॅथेमॅटिक्‍स ॲन्ड लॉजिकल रिझनिंग ॲन्ड स्‍टॅटिस्‍टिक्‍समध्ये आणि बिझनेस इकॉनॉमिक्‍स ॲन्ड बिझनेस ॲन्ड कमर्शियल नॉलेज या विषयांमध्ये प्रत्‍येकी ९७, असे एकूण ३६८ गुण मिळविताना ९२ टक्‍के मिळविले आहेत. सीए फाउंडेशन परीक्षेला नाशिकमधून एक हजार २८८ विद्यार्थी सामोरे गेले होते. त्‍यापैकी ३३० विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णांची टक्‍केवारी २५.६२ टक्‍के इतकी आहे. तर सीए फाउंडेशन परीक्षेमध्ये नाशिकची दिशा देशात प्रथम आली आहे.

परभणीत तीन मद्यपींचा चालकाला वाद, बस पुढे नेण्यापासून रोखले; प्रवाशांचा २० मिनिटं खोळंबा!

दिशाच्या या यशाबद्दल सर्वच थरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दिशाचे वडील हॉलसेलचे व्‍यापारी असून, घरात सीए अशी पार्श्वभूमी नाही. वाणिज्‍य शाखेतून अकरावीला प्रवेश घेतल्‍यानंतर सीए करण्याचा निर्धार केला. त्यानुसार ध्येय डोळ्यासमोर ठेवत नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील एक नामांकित शिकवणी लावली. तसेच अन्य मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेच्‍या तयारीला सुरूवात केली. अकरावीपर्यंत दोन ते तीन तासिका घेतल्‍यानंतर बारावीपासून मात्र पूर्णवेळ लक्ष केंद्रित केले. सकाळी पहिल्‍या सत्रात बारावीचा अभ्यास आणि दुपार सत्रात सीए फाउंडेशनचा अभ्यास सुरू ठेवला. घरी गेल्‍यावर होमवर्क करताना मित्र, परिवारासोबत मौजमजा करत हलके-फुलके वातावरण ठेवण्यावर भर दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here