नवी दिल्ली: एस. जयशंकर (S Jaishankar) यांनी पुन्हा पाकिस्तानला (Pakistan) खडे बोल सुनावले आहेत. पश्चिमेकडील देश भारताचा (India) प्याद्यासारखा वापर करत आहेत, असे आक्षेपार्ह वक्तव्य इम्रान खान (PM ) यांनी केले होते. त्यावरून जयशंकर यांनी पाकिस्तानला खडसावले आहे. कदाचित पाकिस्तान आपलाच इतिहास पाहत असावा. भारत तर असा नाही. आम्हाला आमच्या स्वातंत्र्याचा अभिमान आहे. काही लोकांना वाटते की त्यांनी काहीतरी केले आहे, मग आम्हीही तसेच करू. भारताचा स्वतंत्र असा दृष्टीकोन आहे, अशा शब्दात जयशंकर यांनी पाकिस्तानला टोला लगावला आहे. (eam replied to pak pm imran khan)

काय म्हणाले होते इम्रान खान?

दुनिया न्यूजला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी चीनचे वर्णन ‘खरा मित्र’ असे म्हटले होते. पाकिस्तानचे भविष्य चीनशी जोडलेले असल्याचेही ते म्हणाले होते. चीन हा असा देश आहे जो नेहमीच पाकिस्तानसोबत उभा राहिला. याच मुलाखीतत इम्रान खान यांनी भारताचा उल्लेख केला होता. पश्चिमेकडील शक्ती भारताचा वापर करत आहेत आणि हे दुर्दैवी आहे, असे इम्रान खान म्हणाले होते. पाकिस्तानच्या जवळ जाण्याची भौगोलिक कारणे आहेतच, पण हे देखील एक कारण आहे, असेही इम्रान खान यांनी म्हटले होते.

जयशंकर यांनी उत्तराद्वारे दाखवला आरसा

परराष्ट्र मंत्री यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानला हे खडे बोल सुनावले आहेत. इम्रान खान जे काही बोलत आहेत ते कदाचित आपलाच इतिहास पाहत असावेत आणि आपल्या देशाच्या अस्तित्वावर बोलत असावेत, असे जयशंकर म्हणाले. आमचा इतिहास पाहा, आम्ही दोन कठीण दशके पाहिलेली आहेत, म्हणून आम्हाला आमच्या स्वातंत्र्याचा अभिमान आहे. काही लोकांना असे वाटते की त्यांनी असे केले असेल, तर ते आम्ही देखील करावे. मात्र, भारताचा स्वत:बाबत एक स्वतंत्र दृष्टीकोन आहे, असे जयशंकर म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-

चीन विरोधात भारताच्या बाजूने आहे अमेरिका
चीनने आपल्या विविध प्रकारच्या कारवायांनी अनेक देशांना त्रास दिला आहे. या देशांमध्ये भारत आणि अमेरिकेचा देखील समावेश आहे. याच कारणामुळे गेल्या काही दिवसांमध्ये चीनच्या बाबतीत दोन्ही देशांची जवळीक वाढली आहे. एकेकाळी अमेरिकेच्या इशाऱ्यावर नाचणारा पाकिस्तान आता मात्र चीनच्या बासरीच्या सुरांवर डुलत आहे. याच कारणामुळे आता पाकिस्ताचा अमेरिका नावडता झाला आहे, असे म्हटले जात आहे.

क्लिक करा आणि वाचा-
क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here