वाचा:
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या वर्षी पावसाने थैमान घातले होते. शहराने महापुराचा कटू अनुभव घेतला होता. गेल्यावर्षी १० हजारांहून अधिक कुटुंबांना स्थलांतरित करावे लागले होते. हा अनुभव डोळ्यांसमोर ठेवून पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज आणि सतर्क ठेवली आहे.
याबाबत अतिरिक्त आयुक्त म्हणाले, धरणातून १८ हजार क्युयसेक्सप आणि पवना धरणातून ३ ते ४ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग झाल्यास पवना आणि इंद्रायणी नद्यांची पाण्याची पातळी वाढते. याचा अनुभव पाठीशी असल्याने यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मावळ तालुक्यादतील वडिवळे धरणातून येणारे पाणीही पवना आणि इंद्रायणी नद्यांमध्ये मिळते. या तीन धरणांतील पाणीसाठा वाढला आणि विसर्ग सुरू झाल्यानंतर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क रहावे लागते. ही बाब लक्षात घेऊन महापालिका सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज झाली आहे.
वाचा:
गेल्या वर्षी पिंपरी-चिंचवड शहराला पवना नदीची पाणी पातळी वाढल्याने आणि पावसाचे प्रमाण जास्त राहिल्याने पुराचा फटका बसला. अनेक नागिरकांना स्थलांतरित करावे लागले. हा अनुभव लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपण सद्यःस्थितीमध्ये करोना महामारीचा सामना करीत आहोत. अनेक महापालिकेच्या शाळा आपण विलगीकरण केंद्र म्हणून वापरल्या आहेत. त्यामुळे पुराचा फटका बसणाऱ्या भागातील २० शाळा निर्जंतुकीकरण करून ताब्यात घेतल्या आहेत. काही खासगी शाळांनाही गरज भासल्यास उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित संस्थाचालकांना देण्यात आल्या आहेत. या वेळी फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे लागणार आहे.
पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. नदीकाठच्या नागरिकांना, नदीपात्रालगतच्या झोपडपट्ट्या तसेच इतर पत्राशेड यांना पाण्याची पातळी वाढण्यापूर्वीच स्थलांतरित केले जाणार आहे. शहराला १९८२, १९८५, २००७ आणि २०१९ या वर्षी पुराचा फटका बसलेला आहे. आपत्ती व्यवस्थापन पथक, एनडीआरएफ टीम, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था या सर्वांशी यंदा सुरुवातीपासूनच समन्वय ठेवण्यात आलेला आहे. -संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times