मुंबई: राज्यात गेल्या २४ तासांत २९६ बाधितांचा मृत्यू झाला असून मृतांचा एकूण आकडा २४ हजार ३९९ वर पोहचला आहे. राज्यात आज १६ हजार ४०८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून दिवसभरात ७ हजार ६९० रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण ५ लाख ६२ हजार ४०१ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७२.०४ टक्क्यांवर पोहचले आहे. ( latest updates )

वाचा:

राज्यात करोनाची स्थिती अजूनही चिंताजनक आहे. शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागातही करोना संसर्गाचा जोर पाहायला मिळत आहे. आज दिवसभरात करोनाने २९६ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा एकूण आकडा २४ हजार ३९९ इतका झाला आहे तर सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१३ टक्के इतका झाला आहे. राज्यात आतापर्यंत ४० लाख ८४ हजार ७५४ जणांची करोना चाचणी करण्यात आल्या असून त्यापैकी ७ लाख ८० हजार ६८९ (१९.११ टक्के) इतक्या व्यक्तींच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत तर बाकीच्या चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या १३ लाख ९ हजार ६७६ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून ३५ हजार ३७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

वाचा:

राज्यात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ९३ हजार ५४८ इतकी आहे. या रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यात जिल्ह्यातील आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. पुण्यात सर्वाधिक ५१ हजार ९०९ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पुण्यात एकूण रुग्णसंख्या १ लाख ७३ हजार १७४ इतकी झाली असून आतापर्यंत १ लाख १७ हजार २०५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे तर ४ हजार ६० जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यापाठोपाठ जिल्ह्यात २० हजार ९७६ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर मुंबईत सध्या २० हजार ३२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

> आज नोंद झालेल्या एकूण २९६ मृतांपैकी २२० मृत्यू मागील ४८ तासांतील आहेत तर ४३ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत व बाकीचे ३३ मृत्यू एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.

> राज्यात सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.०४ टक्के इतके आहे. आतापर्यंत एकूण ५ लाख ६२ हजार ४०१ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here