म. टा. वृत्तसेवा, गोंदिया : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत कलावती बांदूरकर यांना मोदी सरकारने मदत केल्याची माहिती दिली. पण, यवतमाळ जिल्ह्यातील कलावती या राहुल गांधी घरी आल्यानंतरच शासकीय मदत मिळाल्याचे सांगत आहेत. यावरून कलावती यांना भाजप नव्हे; तर काँग्रेसने मदत केल्याचे स्पष्ट होते, असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. त्याचवेळी अमित शहा यांनी माझ्याविषयी संसदेत खोटी माहिती दिली, त्यांच्यावर पंतप्रधानांनी कारवाई करावी, अशी मागणी केली.

भंडारा आणि गोंदिया जिल्हा दौऱ्यावर असलेल्या वडेट्टीवार यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘केंद्रीय गृहमंत्र्यांनी लोकसभेत कलावती यांच्या अनुषंगाने देशाला खोटी माहिती पुरविली आहे. कलावती यांच्यासह निर्भयाच्या भावाला पायलट करण्याचे काम राहुल गांधी यांनी केले. केवळ खोटे आरोप करण्यापलीकडे त्यांना काहीही येत नाही. दुसऱ्यांच्या कर्तृत्वावर आपली पाठ थोपटून घेण्याचा हा प्रकार आहे. नऊ वर्षांच्या काळात कोणतेही काम, विकास केला नाही. सांगण्यासारखे काही उरले नसल्याने खोटेनाटे आरोप केले जात आहेत.’

अमित शाहांवर कारवाई करा : कलावती बांदूरकर

‘राहुल गांधी यांनी भेट दिलेल्या कलावती यांना मोदी सरकारने सर्व सुविधा पुरविल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी केला. त्यांनी माझ्याविषयी खोटी माहिती दिली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर कारवाई करावी,’ अशी मागणी कलावती बांदुरकर यांनी गुरुवारी केली.

यासंदर्भात त्यांनी मारेगावच्या तहसीलदारांमार्फत पंतप्रधानांना निवेदनही पाठविले आहे. निवेदन देताना काँग्रेस कार्यकर्त्यांची बहुसंख्य उपस्थिती होती. गृहमंत्र्यांनी बुंदेलखंडच्या कलावती यांचा उल्लेख लोकसभेत केला. पण, या कलावती मारेगाव तालुक्यातील जळका येथील असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

कलावती म्हणाल्या, मोदी सरकारने मला काहीच दिलं नाही, राहुल गांधींमुळे माझं आयुष्य बदललं, अमित शहा तोंडघशी!
मैत्रिणीचे घर फोडणाऱ्या स्मृती इराणींनी राहुल गांधींसारख्या चारित्र्यवान व्यक्तीवर आरोप करणे चुकीचे

लोकसभेत महिलेकडे पाहून नाही, तर लोकसभा अध्यक्षांकडे पाहून फ्लाइंग किस दिला. मैत्रिणीचे घर फोडणाऱ्या स्मृती इराणी यांनी राहुल यांच्यासारख्या चारित्र्यवान व्यक्तीवर आरोप करणे चुकीचे आहे. खुद्द भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनी राहुल यांना असले काही करताना पाहिले नसल्याचे म्हटले आहे. विश्वास नेमका कुणावर ठेवायचा, असा प्रश्न पडला असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.

अमित शाहांनी विचारलं राहुल गांधी जांच्या घरी गेले त्या कलावती यांचं काय झालं? काँग्रेसचा पुराव्यासह पलटवार
‘मौन सुटावे म्हणून अविश्वास’

मणिपूर जळत असतानाही पंतप्रधानांनी मौन बाळगले होते. त्यांचे मौन सुटावे म्हणून विश्वासदर्शक ठराव आणला. आमच्याकडे संख्याबळ नव्हते हे मान्य आहे. आता तरी मणिपूरवरून बोलायला हवे. अदानीला खाणी देण्यासाठी दोन समाजात तेढा निर्माण करण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. देश अस्थिर करण्याचे काम नेमके कोण करीत आहे, हे जनतेला माहिती असल्याचा दावाही वडेट्टीवार यांनी केला.

मोदी निवडून आल्यानंतर काहीच मदत नाही, राहुल गांधींनी मला सर्व काही मदत केली | कलावती बांदूरकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here