ठाणे : कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मूल होत नसल्याने हिस्ट्रोलेप्रोस्कोपीसाठी एका खासगी रुग्णालयात गेलेल्या महिलेचा लेप्रोस्कोपी सुरु असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूजा लोखंडे असं मृत महिलेचं नाव आहे. कल्याण अॅपेक्स रुग्णालयात हा प्रकार घडला. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तर दुसरीकडे रुग्णालयातील डॉक्टर मानसी घोसाळकर यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत.”महिलेला वाचवण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न केले”. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण समजेल, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

विक्रोळी इथे राहणाऱ्या पूजा लोखंडे यांना मूल होत नसल्याने उपचारासाठी त्या कल्याणमधील आपल्या आई-वडिलांकडे आल्या होत्या. त्यांच्यावर कल्याण अॅपेक्स रुग्णालयात उपचार सुरु होते. काल गुरुवारी सकाळी पूजा लोखंडे या आपल्या आईसोबत रुग्णालयात आल्या. सकाळी त्यांची हिस्ट्रोलेप्रोस्कोपी होणार होती. त्यासाठी सकाळीच पूजा रुग्णालयात दाखल झाल्या. परंतु हिस्ट्रोलेप्रोस्कोपी सुरु असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि तासाभरात त्यांचा मृत्यू झाला.

ठाण्यात शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी ५ रुग्ण दगावले, एका मृत रुग्णावर ५ तास उपचार? आव्हाड संतापले
पूजा यांचा मृत्यू झाल्याचं कळताच त्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या मृत्यू झाल्याचा आरोप केला. नातेवाईकांनी मृतदेह घेण्यास नकार दिला. नातेवाईकांच्या गोंधळानंतर बाजारपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

दरम्यान, दुसरीकडे रुग्णालयातील डॉ. मानसी घोसाळकर यांनी मात्र पूजा लोखंडे यांचे आरोप फेटाळले आहेत. संबंधित महिलेवर हिस्ट्रोलेप्रोस्कोपी सुरु होती. याच दरम्यान त्यांची प्रकृती खालावली. त्यांना वाचवण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न केले. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण समोर येईल, असं डॉ. मानसी घोसाळकर म्हणाल्या.

अजित पवारांकडून मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण? नव्या खेळीने नोकरशाही देखील संभ्रमात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here