सिंधुदुर्ग: जिल्ह्यात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. रुग्णसंख्येत रोज नव्याने भर पडत आहे. आज उच्चांकी म्हणजेच १५६ रुग्ण आढळून आले आले. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. ( )

वाचा:

मे महिन्यापासून आजपर्यंत जिल्ह्यात व अन्य भागांतून दोन लाखांहून अधिक संख्येने लोक आले आहेत. सर्वाधिक रुग्णसंख्या तालुक्यात आहे. जिल्ह्यातील काही डॉक्टर्स ,परिचारिका यांनाही करोनाने गाठले आहे. काही पोलिसांनाही करोनाची लागण झाली आहे. कणकवलीतील काही दवाखाने बंद आहेत. वैभववाडी बाजारपेठ पूर्णपणे बंद आहे. जिल्ह्यात एकूण १६१ कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. आजवर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२६५ एवढी झाली असून एकूण १९ जणांचा या आजाराने बळी घेतला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे.

वाचा:

जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६४१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १५६ व्यक्तींचे करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करोनाची स्थिती

एकूण अहवाल १३,४१३
पॉझिटिव्ह आलेले अहवाल १,२६५
निगेटिव्ह आलेले अहवाल १२,०१६
प्रतीक्षेतील अहवाल १३२
सद्यस्थितीत जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्ण ६०५
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १९
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण ६४१

वाचा:

अलगीकरण व जिल्ह्यात प्रवेश केलेल्या व्यक्तींचा तपशील:

अलगीकरणातील एकूण व्यक्ती ११,४२८
२ मे पासून आतापर्यंत जिल्ह्यात आलेल्या व्यक्ती २,०६,३३५
सद्यस्थितीत अॅक्टिव्ह कंटेन्मेंट झोन १६१

वाचा:

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here