पालघर : पोलीस भरती प्रशिक्षणाचे क्लासेस चालवणाऱ्या रेल्वे पोलिसानेच मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. रेल्वे पोलिसात कार्यरत पोलीस आणि त्याच्या मैत्रिणीविरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात या प्रकरणी पॉक्सो व विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

या प्रकरणी आरोपी समाधान गावडे (वय २८ वर्ष) आणि त्याला मदत करणारी त्याची मैत्रीण अशा दोघांना नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपी पोलीस मुंबईजवळच्या नालासोपारा येथे ‘विजयी भव’ नावाची अकादमी चालवतो. तो वसई रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. क्लासमध्ये शिकवण्याच्या नावाखाली आरोपी हा मुलींच्या शरीराला चुकीच्या ठिकाणी स्पर्श करत असल्याचा आरोप आहे. मुलींचा पाठलाग करत त्यांच्या घरी जाऊन त्यांना फिरायला बोलवत होता.

तुझी सोनसाखळी कुठेय? व्हिडिओ कॉलवर अमित शाहूशी वाद, भाजपच्या महिला नेत्यासोबत घातपात
पीडित मुलीचे व्हॉट्सअप स्कॅन करुन आरोपी गावडेने आक्षेपार्ह संभाषण केले होते. आरोपीची मैत्रीण हीसुद्धा पोलीस असून तिने देखील त्याला यामध्ये मदत केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

पुण्यात कोंढवा बुद्रुक स्मशानभूमीजवळ विचित्र अपघात, वाहनं एकमेकांना धडकली, एकाचा मृत्यू
क्लासमध्ये आपल्या सोबत घडलेला प्रकार असह्य झाल्याने पीडित मुलीने क्लासला जाणे बंद केले व मानसिक त्रास झाल्याने तिने आपली आपबिती तिच्या कुटुंबीयांना सांगितली. पीडित मुलींनी या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाणे गाठत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली.

शाळेत पोरं भांडली, बाहेर पालक भिडले; कोल्हापुरात राडा, मारामारीत एकाचा मृत्यू
नालासोपारा पोलीस ठाण्यात आरोपी पोलीस आणि त्याची मैत्रीण असलेल्या महिला पोलिस अशा दोघां विरोधात विनयभंगाचे कलम ३४५, ३५४ (ड), बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०२२ च्या (पॉक्सो) ८, १२, १७ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ सी आणि ६७ ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावात पत्रकार संदीप महाजन यांना भर रस्त्यात बेदम मारहाण, शिंदे गटाच्या आमदारांनी दिली होती धमकी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here