अहमदनगर: नगर जिल्ह्यात आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं दिसत आहे. कारण, गेल्या आठवड्याभरापासून वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत. पाथर्डी तालुक्यातील एका महिलेने आपल्या दहा वर्षांच्या मुलासह आत्महत्या केली आहे. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे १० वर्षांच्या मुलासह महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. मनीषा संदीप नरवडे (३५) आणि ओमकार संदीप नरवडे (१०, दोघे रा. गारूडकर वस्ती, तिसगाव, ता. पाथर्डी) अशी या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहे. तिसगावमध्ये मुलासह महिलेने आत्महत्या केल्याची घटना समजल्यानंतर ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गारुडकर वस्ती जवळील विहिरीजवळ धाव घेतली. माय लेकराचा मृतदेह पाण्यात तरंगताना पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले.

मनिषाला सासरची मंडळी त्रास देत होती. लग्न झाल्यानंतर ४ ते ५ वर्ष चांगले नांदवले. नंतर हळूहळू मागण्या सुरू झाल्या. गाडी घेण्यासाठी, जागा घेण्यासाठी माहेरकडुन पैशांची मागणी सुरु झाली. काही वेळा माहेरच्या लोकांनी लेकीच्या सुखासाठी पैसे दिलेही. मनिषाला नवऱ्याकडून कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये म्हणून त्यांना घर बांधणीकरीता सुमारे चार लाख रुपये दिले. दीर विलास लक्ष्मण नरवडे हा मनिषाच्या चारित्रावर संशय घेत होता. सासरच्या लोकांची पैशांची मागणी वाढतच राहिली. १० वर्षांचा चिमुकला ओमकारला बोलायला त्रास होत होता. त्याच्या उपचारासाठी पतीने माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावला. त्यासाठी तिला सासरची मंडळी मानसिक आणि शारिरीक देत होती.

एकाच देशात दिसले १००० यूएफओ, शास्त्रज्ञांनी सांगितलं कुठे लपले आहेत एलियन्स, पहा…
तसेच मागील १५ दिवसांपूर्वी मनिषाला मारहाण करण्यात आली होती. तिला जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती, असे भावाने फिर्यादीत म्हटलं आहे. संदिप लक्ष्मण नरवडे (नवरा), मिरा लक्ष्मण नरवडे (सासू), लक्ष्मण नरवडे (सासरा), विलास लक्ष्मण नरवडे (दीर) सर्व रा. तिसगांव ता. पाथर्डी, संध्या माने (नणंद) रा. दवाडी ता. पाथर्डी ह. मु. अहमदनगर यांनी वेळोवेळी पैशांची मागणी करून शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने माझी बहीण मनिषाने माझा भाचा ओमकार याच्यासह त्यांच्या शेतातील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे, अशी तक्रार त्यांच्या बहिणीने तक्रार दाखल केली आहे. यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी माहेरचे कुटुंब करत आहेत.

काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here