LIC शेअर सुस्साट
दरम्यान, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवसाच्या सुरुवातीला एलआयसी सजेट ६६६ रुपयांवर खुला झाला आणि व्यवहारावेळी ६७९ रुपयांचा उच्चांक गाठला. नवीन प्रीमियममध्ये घसरण होऊनही जून तिमाहीत नफ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे आज इंट्रा-डेमध्ये शेअर्स जवळपास पाच टक्क्यांनी वाढले. प्रॉफिट-बुकिंगमुळे किमतीत थोडीशी मंदी आली पण तरीही शेअर खूप मजबूत स्थितीत आहे. तथापि, बाजारातील तज्ञांनी गुंतवणुकीसाठी दिलेल्या लक्ष्यानुसार सध्याच्या पातळीपासून शेअर सुमारे ३९% वर चढू शकतो. तर सध्या एलआयसी शेअर बीएसईवर ३.०६% मजबुतीसह ६६१.७५ रुपयांवर असून इंट्रा-डेमध्ये ६७६.९५ रुपयांवर पोहोचला होता.
LIC शेअरवर ब्रोकरेजने नवीन टार्गेट
देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने आपल्या ३० मे रोजीच्या अहवालात रु. ९१७ च्या लक्ष्य किंमतीसह खरेदी रेटिंग कायम ठेवल्यापासून ब्रोकरेजने एलआयसीकडे पाहण्याचा दृष्टीकोन अपरिवर्तित ठेवला आहे. दुसर्या ब्रोकरेज फर्मने ७ जून रोजीच्या अहवालात रु. ७२७ च्या लक्ष्य किंमतीसह ‘बाय’ रेटिंग दिली आहे.
LIC शेअरचे तिमाही निकाल
एलआयसीसाठी जूनचा तिमाही संमिश्र राहिला. कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर १२९९ टक्के वाढून ९५४३ कोटी रुपयांवर पोहोचला असून या कालावधीत विमा कंपनीचा पहिल्या वर्षाचा प्रीमियम ८.३% घसरून ६८१० कोटी रुपयांवर आला. तथापि, गुंतवणुकीतील उत्पन्न वार्षिक आधारावर ६९ हजार ५७० कोटी रुपयांवरून ९० हजार ३०९ कोटी रुपयांपर्यंत वाढले असताना कंपनीने गेल्या तिमाहीत ३२,१६,३०१ पॉलिसींची विक्री केली आहे, तर मागील वर्षी याच कालावधीत ३६,८१,७६४ पॉलिसी विकल्या गेल्या होत्या.