नवी दिल्लीः कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी सोमवारी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विषयावर एक व्हिडिओ जारी करणार आहेत. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी अर्थव्यवस्थेच्या विविध पैलूंवर चर्चा करतील. राहुल गांधी यांनी एका ट्विटमध्ये याबाबत माहिती दिली.

मोदी सरकारने भारतीय अर्थव्यवस्था कशी उद्ध्वस्त केली याविषयी व्हिडिओ मालिका पाहा. पहिला व्हिडिओ उद्या सकाळी १० वाजता माझ्या सर्व सोशल मीडिया चॅनेलवर दिसेल, असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

राहुल गांधींनी यापूर्वीही अनेक व्हिडिओ जारी केले आहेत. करोनामुळे राहुल गांधी व्हिडिओद्वारे नागरिकांपर्यंत आपलं म्हणणं मांडत आहेत. सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठवत ते लोकांशी संवाद साधत आहेत. व्हिडिओ मालिकेत राहुल गांधी वेगवेगळ्या भागातील नागरिकांशी आणि समस्यांच्या निराकरणावर विचारमंथन करत आहेत.

राहुल गांधींनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमावरूनही निशाणा साधला. जेईई-एनईईटी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे. तर पंतप्रधान ‘खेळण्यांवर चर्चा’ करत आहेत. ‘मन की बात’ कार्यक्रमातून पंतप्रधानांनी खेळण्यांविषयी भाष्य केले. ‘मन की बात’ कार्यक्रम जे ऐकत आहेत अशा मुलांच्या पालकांची मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण कदाचित ही ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकल्यानंतर त्यांना खेळण्यांबाबत नवीन मागणी ऐकावी लागेल. खेळण्यांमुळे कार्यक्षमता वाढते. तसंच खेळण्यामुळे आपल्या आकांक्षाही भरारी घेतात, पंतप्रधान मोदी म्हणाले.

यापूर्वी राहुल गांधींनी फेसबुक वादावरून मोदी सरकारवर निशाणा साधला होता. अमेरिकेच्या टाइम मासिकाने व्हॉट्सअ‍ॅप-भाजपमधील संबंध उघड केले आहेत. ४० कोटी भारतीय व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात आणि आता व्हॉट्सअॅपलाही पेमेंट प्लॅटफॉर्म बनवाचा आहेत. यासाठी मोदी सरकारची मान्यता आवश्यक आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवर भाजपचे नियंत्रण आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

67 COMMENTS

  1. [url=https://zithromax.company/]azithromycin 250 mg coupon[/url] [url=https://fluoxetines.com/]prozac 10 mg[/url] [url=https://bactrim247.com/]backtim antibioticsonline.com[/url] [url=https://buycytotec.life/]buy misoprostol online fast shipping india[/url]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here