नवी दिल्लीः भारतात करोनाचा प्रादुर्भाव थांबतच नाहीए. करोना चाचणीत वाढ, अर्थव्यवस्थेची चक्र पुन्हा फिरणं आणि करोना संसर्गाच्या धोक्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष या कारणांमुळे रुग्ण वाढत आहेत, असं तज्ज्ञांनी सांगितलं. एका आठवड्यात देशात सुमारे ५ लाखाहून अधिक नवीन रुग्ण आढळले. या मागची कारणं तज्ञांनी सांगितली.

एका दिवसात देशात कोरोना करोनाचे ७८, ७६१ नवीन रुग्ण आढळून आले. यानंतर रविवारी करोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ही ३५ लाखांवर पोहोचली. आठवड्यापूर्वी करोना रुग्णांची एकूण संख्याही ३० लाखांवर होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. रविवारीपर्यंत एकूण २७,१३,९३३ जण करोनामुक्त झाले आहेत. सकाळी आठ वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, करोनाची एकूण रुग्ण संख्या ३५,४२,७३३ इतकी वाढली आहे. करोनाने मृतांचा आकडा ६३, ४९८वर पोहोचला आहे.

चाचण्या वाढल्याने नवीन रुग्ण समोरः पांडा

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) महामारी विज्ञान आणि संसर्गजन्य रोग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. समीरन पांडा यांनी याबाबत अधिक स्पष्ट आणळी. करोना रुग्णांची वाढ अपेक्षित होती. पण सर्वच राज्यात अशी परिस्थिती नाही. रुग्णवाढ ही काही भागात होत आहे आणि अशा समूहांमध्ये आहे जिथे दाट लोकसंख्या आहे आणि अशा लोकांमध्ये कोणतीही लक्षण किंवा सौम्य लक्षणे नसतात. यामुळे करोनाचा प्रादुर्भवा वाढत आहे. यामुळे हा संसर्ग रोखण्यासाठी या भागात अधिक प्रयत्न करावे लागतील. चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे करोनाची नवीन रुग्ण आढळून येत आहेत, असं ते म्हणाले.

जगात तिसऱ्या क्रमांकावर

याशिवाय अर्थव्यवस्थेची चक्र फिरून झाल्याने आणि नागरिकांच्या वाढत्या हालचालींमुळे संसर्गाबाबत त्यांच्यात आत्मसंतुष्टतेची भावना निर्माण झाली आहे. यामुळे नवीन रुग्ण वाढत आहेत, असं पांडा यांनी सांगितलं. नागरिक मास्क घालणं, हात स्वच्छ करणं आणि सामाजिक सोशल डिस्टन्सिंग टाळण्याचे नियम पाळत नाहीत. याच कारण म्हणजे करोना लवकर बरं होत असल्याचा त्यांचा विचार आणि मृत्यू दराचे घटते प्रमाण. यामुळे करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. करोनाच्या एकूण रुग्णसंख्येत भारत जगात तिसऱ्या स्थानावर आहे. आणि मृतांच्या संख्येतही आपण जगात तिसर्‍या क्रमांकावर आहोत, असं तज्ज्ञ शाहिद जमील यांनी सांगितलं.

‘संसर्ग रोखणं वैयक्तीक पातळीवरच शक्य’

“करोना रुग्णांची संख्या रोखण्यासाठी आता सरकारकडे कोणताही मार्ग उपलब्ध नाही. आता वैयक्तीक पातळीवरच करोना रोखणं शक्य आहे. अर्थव्यवस्था सुरू होताच रुग्ण वाढ होईल. लॉकडाउन संसर्गापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना तयार करणं आणि संवेदनशील करण्यासाठी होता. आता मृत्यूदर रोखणं सर्वात महत्वाचं आहे. म्हणूनच सरकारचे प्रयत्न मृत्यूदर कमी करण्याच्या दिशेने असले पाहिजेत, असं आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. के. के. अग्रवाल यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here