अहमदनगर : स्वातंत्र्य दिनाला जोडून सलग सुट्ट्या आल्याने पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या वाढणार आहे. पावसाळी पर्यटनासाठी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणावरही मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अहमदनगर पोलिसांनी १३ ते १६ ऑगस्ट या काळात वाहतुकीसंबंधी आदेश जारी केले आहेत.

पर्यटकांनी दंड आणि त्रास टाळण्यासाठी भंडारदरा धरण भागात येण्यापूर्वीच याची माहिती ठेवणे आवश्यक आहे. या भागात एकेरी वाहतूक करण्यात आली असून अत्यावश्यक सेवा आणि शासकीय वाहनांना वगळण्यात आले आहे.
Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांना ‘सुप्रीम’ धक्का; कनिष्ठ कोर्टाच्या आदेशाविरुद्धची याचिका फेटाळली, खटला चालणार
संभाव्य गर्दी तसेच पावसामुळे खराब झालेले रस्ते, आधीच या भागातील अरूंद रस्ते यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी हा आदेश दिला.
आमदार काळे म्हणाले, कोपरगावची जागा राष्ट्रवादीलाच! स्नेहलता कोल्हे यांनी एका वाक्यात दिले उत्तर
अशी असेल वाहतूक

> रंधा फाटा येथून भंडारदरा येथे जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. शेंडी/भंडारदरा येथे जाण्यासाठी वाकी फाटा, वारंघुशी फाटा येथून प्रवेश असेल.

तुमचे आजोबा मुख्यमंत्री होते, म्हणून तुम्ही उद्योगपती; राम शिंदेंचा रोहित पवारांवर पलटवार

> एकेरी वाहतुकीचा मार्ग वारंघुशी फाटा – वाकी फाटा – चिचोंडी फाटा – यश रिसॉर्ट शेंडी, भंडारदरा धरण स्पील्वे गेट – भंडारदरा गाव – गुहिरे रंधा मार्गे इच्छितस्थळी जाता येणार आहे. भंडारदरा परिसरात सध्या पाऊस नाही. मात्र, आतापर्यंत झालेल्या पावसामुळे धरण जवळपास भरलेले आहे. शिवाय बहुतांश झरे, ओढे, नालेही वाहते आहेत. निसर्गराजी बहरलेली आहे. त्यामुळे भंडारदरा धरण, रंधा धबधबा, कोकणकडा, हरिश्चंद्रगड, कळसूबाई शिखर, अमृतेश्वर मंदिर रतनवाडी या प्रेक्षणीय स्थळी पुणे, नाशिक, ठाणे मुंबई आणि अहमदनगर जिल्ह्यातून मोठया प्रमाणात पर्यटक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनीही नियोजन आणि बंदोबस्ताची तयारी केली आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांनी नियमांचे पालन करावे, येणाऱ्या वाहनांची तपासणी होणार आहे. मद्यपान करणे किंवा मद्य बाळगणे टाळावे, नियम पाळून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन राजूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here