सुशांत प्रकरणी ज्या घडामोडी घडत आहेत त्यावरून संशयाचे वातावरण निर्माण होत आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी असे भारतीय जनता पक्षाचे स्पष्ट मत आहे. त्यात आम्ही कुणाचेच नाव घेतलेले नाही. कुणावर आरोपही केलेले नाहीत. भाजपचा या सगळ्या प्रकरणात काहीही संबंध नाही. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी काँग्रेस प्रवक्ते काहीही आरोप करत आहेत. ही सगळी गोष्ट त्यांच्याच अंगलट येत असल्याने हा खटाटोप सुरू आहे, असा प्रतिहल्लाही यांनी केला.
मंदिरे खुली झाली पाहिजेत ही जनभावना आहे. तुम्ही सलून, दारूची दुकाने उघडता, या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जायची परवानगी देता, सगळी मार्केटही उघडलीत देवाचे दारच का बंद ठेवले, असा सवाल दानवे यांनी विचारला. करोना आपत्ती संदर्भात राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोपही दानवे यांनी केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times