नदीत पडून दोन भावांचा मृत्यू
शहबाज आणि शाह आलम हे दोघे भाऊ शनिवारी संध्याकाळी ४ वाजता भिवंडी येथील कामवारी नदीत चाविंद्रा पेट्रोल पंपाच्यामागे मासे पकडण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांची आई देखील त्यांच्यासोबत होती. मासेमारी करताना सेल्फी घेण्याच्या नादात एकाचा पाय घसरला आणि तो पाण्यात बुडाला. भावाला बुडताना बघून दुसऱ्या भावाने पाण्यात उडी घेतली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोन्ही भाऊ पाण्यात बुडाले. आईच्या डोळ्यादेखत हा सर्व प्रकार घडला. आपल्या मुलांना पाण्यात वाहून जाताना तिनं पाहिलं.
आईने केलेल्या आरडाओरडीमुळे स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक तरूणांनी तातडीने पाण्यात उतरून शोधकार्य सुरू केलं. रात्री साडेसातनंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं. या दुर्दैवी घटनेमुळे मिल्लत नगर भागात शोककळा पसरली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times