पुणे : कर्वे रस्त्यावरील काही भागातील ‘नो पार्किंग’ रद्द करून दोन्ही बाजूंना पार्किंगसाठी परवानगी देण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी घेतला. जून महिन्यात महापालिकेने परवानगी दिल्यानंतर; तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सूचना दिल्यानंतरही हा निर्णय घेण्यास पोलिसांना दोन महिने लागले.

मेट्रो प्रकल्प, दुमजली उड्डाणपूल आणि अन्य विकासकामांसाठी २०१८ पासून कर्वे रस्त्यावर खंडोजीबाबा चौक ते हुतात्मा राजगुरू चौक (करिष्मा सोसायटी) या दरम्यान दुतर्फा वाहने लावण्यास मनाई करण्यात आली होती. मेट्रोचे काम पूर्ण झाले, तरी कर्वे रस्त्यावर पार्किंगला परवानगी नसल्याने व्यवसायाचे नुकसान होत असल्याचे येथील व्यावसायिकांचे म्हणणे होते. अखेर दोन महिन्यांनी वाहतूक पोलिसांनी दुतर्फा पार्किंगला परवानगी दिल्याने आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या पुढील वैद्यराज मामा गोखले चौक ते सोनल हॉलजवळील स्वातंत्र्य चौकादरम्यान वाहने लावता येणार आहेत. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी शुक्रवारी याबाबतचे आदेश दिले.

Mumbai Mega block : मुंबईकरांनो, उद्या तिन्ही लोकल मार्गांवर मेगाब्लॉक, खोळंबा टाळण्यासाठी पाहा वेळापत्रक
असे असेल पार्किंग…

– वैद्यराज मामा गोखले चौकाकडून (रसशाळा) ते स्वातंत्र्य चौकाकडे जाताना.

– बँक ऑफ महाराष्ट्रसमोर दहा मीटरचे चारचाकी पार्किंग.

– भाग्यश्री ज्वेलर्स ते चैतन्यनगरी सोसायटी दरम्यान १५ मीटरचे चारचाकी पार्किंग.

– युनियन बँक ते स्वप्ननगरी सोसायटी दरम्यान २० मीटरचे चारचाकी पार्किंग.

– सिद्धेश्वर मेडिकल ते कोहिनूर वाइन शॉप दरम्यान १५ मीटरचे दुचाकी पार्किंग.

– गणेश चेंबर, रेबन शोरूम ते अमर हार्डवेअरपर्यंत १५ मीटरचे दुचाकी पार्किंग

– स्वातंत्र्य चौक ते वैद्यराज मामा गोखले चौक (रसशाळा)

– कल्याण ज्वेलर्सशेजारील धनश्री ग्लास दुकान ते गो-कलर्स दुकानपर्यंत ५ मीटर दुचाकी पार्किंग.

– जगन्नाथ तरटे मार्गाशेजारील ओपन हाउस ते सारथी हॉटेल ते प्राइम फर्निचर शोरूमपर्यंत २५ मीटर दुचाकी व २५ मीटर चारचाकी पार्किंग

– भोंडे कॉलनी लेन ते कचरे पथ पर्यंत १० मीटर दुचाकी व १० मीटर चारचाकी पार्किंग

Mumbai Weather: ऑगस्टमध्ये पाऊस गायब, उकाड्याने नागरिक हैराण; मुंबईत आज कसं असेल हवामान?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here