सातारा : परमिटरूमच्या माध्यमातून दारूच्या अवैध वाहतुकीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना दोन सहायक पोलिस निरीक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही घटना शुक्रवारी दुपारी औंध येथील जुना बाजार पटांगण येथे घडली. दत्तात्रय दराडे आणि बापूसाहेब जाधव अशी या पोलिस निरीक्षकांची नावे आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, औंध येथील एका व्यक्तीचे परमिट रूम असून, दारूची अवैध वाहतूक केल्यामुळे त्याच्यावर औंध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात संबंधित व्यक्तीला दाखल असणाऱ्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व येथून पुढे व्यवसायात कोणताही त्रास न देण्यासाठी औंध पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि सहायक पोलिस निरीक्षक बापूसाहेब जाधव या दोघांनी संबंधित व्यक्तीकडे दीड लाख रुपये लाचेची मागणी केली होती.

Mumbai Mega block : मुंबईकरांनो, उद्या तिन्ही लोकल मार्गांवर मेगाब्लॉक, खोळंबा टाळण्यासाठी पाहा वेळापत्रक

तडजोडीअंती एक लाख रुपये देण्याचे ठरले. संबंधित व्यक्तीने याबाबतची तक्रार सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. या प्रकरणात औंध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे परिक्षेत्र पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा येथील प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक उज्ज्वल अरुण वैद्य यांच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here