नागपूर: भाजप महिला नेत्या आणि अल्पसंख्याक मोर्चाच्या महिला आघाडी अध्यक्ष सना खान या १ ऑगस्टला जबलपूरसाठी रवाना झाल्या होत्या. २ ऑगस्टला तिथे पोहोचल्यावर त्यांनी त्यांच्या आईला तिथे पोहोचल्याची माहिती कळवली. पण, हा त्यांचा अखेरचा फोन कॉल होता. त्यानंतर सना खान या बेपत्ता झाल्या. त्यांच्या आईने अनेकदा त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला पण कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.

मुलगी फोन का घेत नाही म्हणून त्यांना काळजी वाटली. म्हणून त्यांनी थेट नागपुरातील मानकापूर पोलिस ठाण्यात धाव घेत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यानंतर नागपूर पोलिसांचे पथक जबलपूरला गेले आणि त्यांनी शोधमोहीम राबवली. मात्र, त्यांना सना खान सापडली नाही. विशेष म्हणजे ज्या दिवसापासून सना खान बेपत्ता होत्या त्याच दिवसापासून अमित उर्फ पप्पू शाहू हा देखील बेपत्ता होता. सना खानने चार महिन्यांपूर्वी आरोपी अमित उर्फ पप्पू शाहूशी लग्न केले होते.
यावेळी पोलिसांनी पप्पू शाहूच्या ढाब्यावर काम करणाऱ्या एका वेटरला अटक केली आणि धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली.

तुझी सोनसाखळी कुठेय? व्हिडिओ कॉलवर अमित शाहूशी वाद, भाजपच्या महिला नेत्यासोबत घातपात
सना खानची घरातच हत्या

ज्या सना खानला ते बेपत्ता असल्याचं समजत होते त्या सना खानची हत्या करण्यात आली होती. वेटर जितेंद्र गौर याने २ ऑगस्ट रोजी साहूच्या कारची रक्ताने माखलेले डिक्की धुतली होती. साहूने सना खानची घरातच हत्या केली. त्यानंतर सना खान यांचा मृतदेह डिक्कीमध्ये ठेवून जबलपूर-दमुआ-कटंगी रस्त्यावरील ढाब्यापासून काही अंतरावर असलेल्या हिरण नदीत फेकून दिला अशी कबुली त्याने दिली.

नागपूर आणि जबलपूर पोलिस सध्या सना खान यांचा मृतदेह शोधत आहेत. पण, २ ऑगस्टला सर्वत्र मुसळधार पाऊस झाला होता. नद्यांनाही पूर आला होता. त्यामुळे १० दिवसांनंतरही सना खान यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.

७ फूट उंची, पिवळे डोळे अन्… येथे एलियन्सच्या हल्ल्याचा दावा, दहशतीमुळे लोकांची झोप उडाली
पतीनेच केली हत्या, कारणंही आले पुढे

सना खान यांच्या हत्येतील मुख्य आरोपी अमित ऊर्फ पप्पू साहू आणि अन्य दोघांना ताब्यात घेऊन मानकापूर पोलिस नागपुरात दाखल झाले आहेत. गोराबाजार पोलिसांनी आरोपी अमितला शुक्रवारी अटक केली होती. चौकशीत आरोपीने सनाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. यासोबतच त्यांचा मृतदेह हिरण नदीत फेकल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

महाराष्ट्र पोलिसांनी आरोपी अमित साहू, त्याचा नोकर जितेंद्र आणि अन्य एका आरोपीला २४ तासांच्या रिमांडवर नागपूरला आणले आहे. अमित आणि त्याच्या अन्य दोन साथीदारांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. जिथे त्याला एक दिवसाच्या रिमांडवर पाठवण्यात आले. दुसरीकडे, शनिवारी कोर्टात हजर केल्यानंतर तिघांनाही पुन्हा जबलपूरला नेण्यात येणार आहे.

गुन्हे शाखेसह मानकापूर पोलिसांचे पथक आरोपी अमित उर्फ पप्पू साहूच्या शोधात जबलपूरला पोहोचले होते. रात्रभर शोध घेतल्यानंतर पोलिसांना यशही मिळाले. शुक्रवारी सकाळी पप्पू साहूला पोलिसांनी शोधून ताब्यात घेतले.

उत्खननात मुलीला सापडला १५०० वर्ष जुना जादूचा आरसा, पाहा कसा दिसायचा, वापर ऐकून चक्रावाल
चार महिन्यांपूर्वी आरोपीशी झाला होता विवाह

सना खानने चार महिन्यांपूर्वी आरोपी अमित उर्फ पप्पू साहूशी लग्न केले होते. आरोपीचे हे दुसरे लग्न होते. यापूर्वी त्याचे एका महिला पोलिस कर्मचाऱ्याशी लग्न झाले होते. कोर्ट मॅरेजच्या वेळी सनाने अमितला सोन्याची चेन भेट दिली होती. गेल्या काही दिवसांपासून सना जेव्हाही त्याला व्हिडिओ कॉल करायची तेव्हा त्यांच्या गळ्यातील साखळी साहूला दिसत नव्हती. यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद झाले होते.

सना खान यांना सोने परिधान करण्याची आवड होती. त्यांच्या गळ्यात नेहमी चार ते पाच लाखांचे दागिने असायचे. २ ऑगस्टला सना जबलपूरला पोहोचल्या तेव्हाही त्यांनी सोनं घातलं होतं. सनाने अमितला दिलेली सोनसाखळी जुलै महिन्यापासून गायब होती. सनाने अमितला विचारले असता त्याने बोलणं टाळले. अमितने साखळी विकल्याचा संशय तिला आला होता.

तीन मोबाईल, १० सिमकार्ड ठेवायच्या सना खान

भाजप नेत्या सना खानसोबत तीन मोबाईल फोन ठेवायच्या. त्यांच्याकडे ८ ते १० वेगवेगळे सिम कार्डही होते. या सिमवर त्या कोणाशी आणि काय बोलायच्या याचाही पोलिस तपास करत आहेत. सनाचे तीन मोबाईल आणि सिमही गायब आहेत. सना आणि अमित यांचे मोबाईल २ ऑगस्टपासून बंद आहेत.

काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना

सोनसाखळीवरुन झाला वाद

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार १ ऑगस्टला सकाळी पप्पूने सना यांना व्हिडिओ कॉल केला. यावेळी सना यांना पप्पूच्या गळ्यात सोनसाखळी दिसली नाही. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. तसेच, आर्थिक व्यवहारावरूनही दोघांमध्ये वाद सुरू होता. वाद झाल्यानंतर याच दिवशी रात्री सना या जबलपूरला गेल्या आणि साहूने त्यांची हत्या केली. याप्रकरणी अद्याप तपास सुरु आहे. आता सना यांच्यासोबत नेमकं काय, कसं, कधी आणि का घडलं या साऱ्या प्रश्नांची उत्तरं साहूच्या कबुली जबाबानंतर समोर येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here