अहमदनगर: आपल्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. त्या दुःखातून सावरणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. मात्र आपल्या कुटुंबातील एखादा सदस्य गमावून त्याचं जाणं त्यानंतर त्या व्यक्तीच्या आठवणीत वृक्षारोपण करणं, हे खरचं आदर्शवत आहे. जामखेडमधील वराट कुटुंब घरातील वयोवृद्ध व्यक्तीचे निधन झाल्यानंतर राख पाण्यात विसर्जित न करता वृक्षारोपण केले.
प्रियांका गांधींनी संसदेत असायला हवं, रॉबर्ट वाड्रांच्या वक्तव्यानं चर्चा, संसदीय राजकारणात एंट्री होणार का?
बाजीराव गणपती वराट (९४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा सावडण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी राख आणि अस्ती पाण्यात विसर्जित न करता शेतातच खड्डे करून त्यात राख टाकण्यात आली. वृक्षारोपण करण्यात आले. यामाध्यमातून पारंपरिक पद्धतीला फाटा देणाऱ्या वराट कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मृतकावर अंत्यसंस्कार केल्यानंतर लाकडाची होणारी राख आणि अस्ती नदीच्या वाहत्या पाण्यात टाकण्याची परंपरा पूर्वापार पासून चालत आलेली आहे. मात्र रुढी, परंपरेला फाटा देत बाजीराव वराट यांचा मुलगा बाबासाहेब वराट, मुलगी, नातू दिनेश वराट, दिपक वराट, बंकट वराट आणि सर्व पाहुणे मंडळीनी राख आणि अस्तींचे विसर्जन पाण्यात करण्याऐवजी शेतातच खड्डे करून त्यात ते टाकून वृक्षारोपण करण्याची इच्छा उपस्थितांसमोर व्यक्त केली. त्यास सर्वांनी अनुमोदन दिल्यानंतर सर्वांसमक्ष हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.

शाळेतील आठवण, दिवंगत प्रा. हरी नरकेंची मुलगी प्रमितीकडून वडिलांच्या आठवणींना उजाळा

परिसरात ते नाना नावाने परिचित होते. भजन, किर्तनात गोड गायनाबद्दल त्यांची ख्याती होती. त्यांनी गावात भजन आणि बारशीचे कार्यक्रम सुरू केले होते. ते आजतागायत सुरू आहेत. तसेच सुमारे बारा वर्षे सायकलवर पंढरपूर वारी केली. काही दिवस बैलगाडीने तर अनेक वर्षे पायी वारी केली. झाडांच्या रूपाने सदैव नाना यांच्या स्मृती आपल्यासमोर राहणार आहेत. हाच आर्दश इतरांनी घ्यावा, असे गावातील जाणकार आणि पाहुण्यांनी मत व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here