अनंतकुमार फाउंडेशनने आयोजित केलेल्या ‘नेशन फर्स्ट’ वेब सेमिनारमध्ये डॉ. हर्षवर्धन बोलत होते. काही दिवसांनंतर हा आजार इतर साथीच्या आजाराप्रमाणे एक स्थानिक साथीचा आजार उरेल आणि याच्याशी डॉक्टर देवी प्रसाद शेट्टी आणि डॉक्टर सी. एन. मंजूनाथ यांच्या सारखे विशेषज्ञ देखील सहमत होतील, असे आरोग्यमंत्री म्हणाले.
या करोना विषाणूने आम्हाला विशेष गोष्टी शिकवल्या आहेत. आता काही नवे होईल, स्थिती सामान्य होईल आणि आम्हाला या पुढील काळात आपल्या जीवनशैलीबाबत अधिक सावध राहावे लागेल अधिक काळजी घ्यावी लागेल, असे डॉ. हर्षवर्धन पुढे म्हणाले. या वर्षाच्या शेवटपर्यंत करोना विषाणूवर लस येईल, असा विश्वासही डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केला.
क्लिक करा आणि वाचा-
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात आतापर्यंत मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ६५ हजारांच्या आसपास पोहोचली आहे. तसेच देशभरातील करोनाची लागण झालेल्या बाधितांची एकूण संख्या ३६ लाख, १६ हजार ७३० वर पोहोचली आहे. तसेच २७ लाख ६७ हजार ४१२ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर, आतापर्यंत देशात असलेल्या एकूण सक्रिय रुग्णांची सख्या ८ लाखांच्या (७,८४,७६८) आसपास पोहोचली आहे.
क्लिक करा आणि पाहा
क्लिक करा आणि पाहा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times