धुळे : धुळे शहरातील जुनी महानगर पालिकेच्या जवळ असलेल्या प्रबोधनकार ठाकरे संकुलात असलेल्या प्रियंका स्पोर्ट्स या दुकानाला शॉट सर्किटनेस भीषण लागली आहे. यामध्ये लाखो रुपयांचा माल हा या आगीत जळून खाक झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच धुळे महानगरपालिकेच्या अग्निशामक बंबाच्या साह्याने ही आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

शहरातील जुनी महानगर पालिका जवळ असलेल्या प्रबोधनकार ठाकरे संकुल येथील नामांकित प्रियंका स्पोर्ट येथे आज रात्री ८ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत लाखोचे वस्तू खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही प्रियंका स्पोर्ट या दुकानात नेमकं हंगाम सुरू असताना कमाई वर फिरले पाणी आहे. आग नेमकी कशी लागली अद्यापही कळाले नाही.

IND vs Malasia : हॉकीत भारताची ऐतिहासिक कामगिरी, मलेशियाला धूळ भारतानं चौथ्यांदा पटकावली ट्रॉफी
आग लागल्याची चर्चा संपूर्ण शहरभर झाल्याने बघ्यांची असंख्य गर्दी केली होती, महानगरपालिकेचे बंब घटनास्थळी दाखल झाल्याने कर्मचाऱ्यांसोबत इतर काही नागरिकांनी देखील आग विझविण्यासाठी हातभार लावला. तासोंतास आग विझवण्याचा प्रयत्न करीत असलेले अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण होत नव्हते महानगरपालिकेचे कर्मचारी व अग्निशामक ची संपूर्ण टीम या कामासाठी कार्यरत होती.

Loan becoming expensive; आरबीआयने तर व्याजदरात वाढ केलेली नाही, मग कर्ज का होतंय महाग?
ज्याप्रकारे अग्निशमन टीमला प्रशिक्षण दिले जाते त्याचप्रमाणे या ठिकाणी कुठेही वस्तुस्थिती दिसली नाही याबाबतीत धुळेकर नागरिकांमध्ये अग्निशामक विभागवार प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

शासन या विभागासाठी लाखो करोडचा खर्च करते परंतु त्याचा फायदा आपत्कालीन परिस्थितीत काही होतांना दिसत नाही. त्यामुळे या यंत्रणेत सुधारणा करण्याची नित्यांत गरज असल्याची चर्चा धुळेकर नागरिकांमधून यावेळी व्यक्त केली जात होती.

कोल्हापुरात राजकीय हालचालींना वेग, राजू शेट्टी काँग्रेससोबत जाणार?, पृथ्वीराज चव्हाण म्हणाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here