वसई : मुलीच्या संगनमताने पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पश्चिम येथे उघडकीस आली. या प्रकरणी नालासोपारा पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नालासोपारा पश्चिमेला हनुमान नगर येथे सुरेश जग्गा वाघेला (४६) हा पत्नी जसु वाघेला (३९) आणि मुलगी मोनिका वाघेला (२३) यांच्यासह राहत होता. या तिघांमध्ये आर्थिक कारणांवरून नेहमीच खटके उडत होते. २६ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सुरेश आणि त्याची मुलगी व पत्नी यांच्यात पैशांवरून भांडण सुरू झाले होते. वाद सुरू असताना खिडकीची तुटलेली काच सुरेश यांना लागून गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी उपचाराआधीच मृत घोषित केले.

याबाबत नालासोपारा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंददेखील करण्यात आली, मात्र तपासादरम्यान सुरेश यांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार नालासोपारा पोलिसांनी त्यांची पत्नी जसु आणि मुलगी मोनिका यांच्याविरोधात शनिवारी हत्येचा गुन्हा दाखल करून तत्काळ अटक केली. त्यांना ५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे नालासोपारा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर माने यांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here